राशीचा स्वभाव समजून घ्या आणि त्यानुसार वागून यश मिळवा

    03-Aug-2022
Total Views |
 
 
संध्यानंद.काॅम
 

Horoscope 
आशेवर आपण जगत असताे. आज मनाप्रमाणे काही झाले नसले, तरी उद्या हाेईल असे वाटणे म्हणजे आशा.जीवनात अनेकदा नकार पचवावे लागतात. कधी नाेकरीत तर कधी प्रेमात आणि अन्य अनेक ठिकाणीसुद्धा.नकार मिळणे ही दुखावणारी घटना असते आणि त्यावर काय प्रतिक्रिया द्यावी हे व्यक्तीच्या स्वभावानुसार ठरते. आपली रासही त्यात भूमिका बजावत असते.काही जण नकार शांतपणाने स्वीकारून नव्याने प्रयत्न सुरू करतात, तर काही जण संतापून सगळे साेडून देतात. आपल्या राशीचा स्वभाव समजून घेतलात, तर नकाराला कसे सामाेरे जावे हे समजण्यास मदत हाेईल.
 
तुम्हालाही कदाचित नकाराचा अनुभव आला असेल.कधी नाेकरीत, कधी पदाेन्नतीत, ग्राहकांकडून अथवा मित्र-मैत्रिणींकडून. कदाचित विवाहासाठीसुद्धा नकार मिळालेला असेल. पण राशी समजून घेतल्यात, तर या नकाराच्या प्रसंगाला सामाेरे कसे जावे हे समजेल.यावर किती विश्वास ठेवावा हा व्यक्तिगत प्रश्न असला, तरी काही प्रमाणात त्याचा उपयाेग हाेऊ शकताे. बघा, आपली रास आणि वैशिष्ट्ये.
 
मेष
 
तुम्ही या राशीचे असाल, तर जे काही कराल ते सर्वाेत्तम करणारे असता. पण उत्तम गुणवत्ता आणि आत्मविश्वास असूनही अशा लाेकांना काही वेळा नकार स्वीकारावा लागताे.मात्र, इतरांपेक्षा तुमच्यावर अशी वेळ कमी येते. पण त्यामुळेच तुम्हाला नकार पचविणे कठीण हाेऊन संताप येताे. अगदी छाेटा नकारही तुम्हाला सहन हाेत नाही.तुम्हाला मिळालेल्या नकाराचे खापर तुम्ही इतरांवर फाेडता.
 
वृषभ
 
अत्यंत आत्मविश्वास असलेली, जबाबदार आणि व्यावहारिक अशी ही रास आहे. एखाद्या नकारातून तुम्ही लवकर सावरता. त्याचे कारण म्हणजे, त्या घटनेला सामाेरे जाण्यासाठी आपली पूर्वतयारी काही नसल्याचे तुम्हाला माहिती असते. या ध्न्नयातून
सावरण्यासाठी या राशीचे लाेक मित्र-कुटुंबीयांबराेबर बाहेर जातील, एकटे राहतील, बाहेर जेवायला जातील किंवा आवडते चाॅकलेट-आइस्क्रीमचा आस्वाद घेऊन ती घटना विसरण्याचा प्रयत्न करतील.
 
मिथुन
 
नकार मिळाल्यावर त्यावरील तुमची प्रतिक्रिया वेगळी असू शकते.प्रत्येक वेळी तुमची प्रतिक्रिया वेगळी असल्यामुळे तुमचा जाेडीदार आणि कुटुंबीयांनाही त्याचा अंदाज येत नाही. आपल्याला नकार का मिळाला याबाबत तुम्ही जाेडीदार किंवा कुटुंबीयांबराेबर बाेलू शकता. त्यांच्याकडून तुम्हाला आधार मिळेल.
 
कर्क
 
तुम्हाला नकाराची भीती वाटत असल्यामुळे तुम्ही तुमच्या काेशात राहता आणि काही नवीन प्रयत्न करणे साेडून देता. तुम्हाला नकार मिळाल्याचे तुम्ही तुमच्यापुरतेच ठेवता आणि वर्तन अथवा अन्य काेणत्याही प्रकारे तुम्ही ते काेणाला दिसू देत नाही. तुमच्या भावना दडपून ठेवल्यामुळे तुमच्यावर काय प्रसंग ओढावला आहे याची काेणाला जाणीव हाेत नाही.
 
सिंह
 
आपल्याला हवे ते मिळवायचे अशी तुमची सवय असल्याने तुम्ही नकार पचवू शकत नाही. असा नकार कधी मिळाला, तर तुम्हाला तुमच्या क्षमतांविषयी शंका येऊ लागतात आणि आपण पुरेसे सक्षम नसल्याचे वाटायला लागते. नकारातून सावरण्यासाठी तुम्ही आजूबाजूच्यांवर रागवायला लागता. पण नंतर नकार स्वीकारता.
 
कन्या
 
तुम्ही नकाराला सामाेरे जाऊ शकत असलात, तरी अंतर्मनात त्याचा त्रास हाेताे. काही घडलेच नसल्यासारखे वागणे असले, तरी आतून मात्र तुम्ही मूकपणाने रडत असता. अचूकतेसाठी तुमचा आत्यंतिक आग्रह आणि उच्च दर्जाच्या निकषांमुळे तुम्हाला अनेकदा नकार स्वीकारावे लागतात. तुमचे निकष सर्वांना पाळणे श्नय नसते. नकार का मिळाला याची चिकित्सा करता व पुढे त्या चुका हाेणार नाहीत याची दक्षता घेता.
 
तूळ
 
नकाराला सामाेरे जाताना तुमची प्रतिक्रिया संमिश्र असू शकते.काही वेळा तुम्ही नकार सहजतेने घेऊन ताे स्वीकारता, तर काही वेळा काय चुकले याचा विचार करता. पण नकारामुळे तुम्हाला फार माेठा धक्का बसत नाही आणि तुम्ही पुढे जाता.
 
वृश्चिक
 
तुमच्यावर विश्वास असलेले लाेक तुमच्याभाेवती असल्यामुळे सहसा तुम्हाला नकार स्वीकारावा लागत नाही. तुमच्या आयुष्यात नकाराचे प्रसंग कमी येत असले, तरी आपल्या नशिबामुळे असे घडल्याचा विचार केलात, तर तुम्हाला फार फरक पडत नाही. नकार मिळाल्यावर तुम्ही काही काळ एकांतात राहता. आपल्याला नकार मिळाल्याचे प्रियजनांना कळू नये म्हणून तुम्ही असे करता.
 
धनू
 
तुम्हाला आनंदात राहणे आवडत असल्यामुळे नकार मिळाल्यावर तुम्ही आनंदी राहण्यासाठी सहकारी, मित्रांबराेबर काेठे तरी हँगआउटला जाणे पसंत करता, त्यांना पार्टी देता. नकाराचे दु:ख तुम्ही तुमच्याजवळच ठेवता आणि त्यातून बाहेर येण्यासाठी काही वर्षेसुद्धा लागू शकतात.
 
मकर
 
तुम्ही वास्तववादी असल्यामुळे नकार आणि अपयश हे जीवनाचा एक भाग असल्याचे तुम्हाला माहिती असते. कायम काही तरी वाईटाची अपेक्षा असल्यामुळे तुम्हाला नकाराचे दु:ख हाेत नाही, आश्चर्यही वाटत नाही. त्यामुळे तुम्ही नाउमेदसुद्धा हाेत नाही. घडलेल्या घटनांचे दु:ख करण्यापेक्षा आपले नेहमीचे आयुष्य जगत राहता.
 
कुंभ
 
नकारानंतर तुम्ही तुम्हाला तुमच्या जगात बंदिस्त करून घेता आणि एकाकी राहणे पसंत करता. पण नकारामुळे तुम्हाला काय वाटते याबाबत तुम्ही प्रियजनांबराेबर बाेलायला हवे. नकारामुळे तुम्हाला रडू येते आणि भावना आवरता येत नाहीत.
 
मीन
 
तुम्हाला फँटसी आवडत असल्यामुळे नकार मिळाल्यावर तुम्ही नव्या कल्पनाविश्वात रमता. सर्व काही छान असल्याचे दाखवत तुम्ही तुमचे अपयश दडविण्याचा प्रयत्न करता. नकाराची जबाबदारी आपल्यावर घेऊन तुम्ही दु:खी हाेता. त्याचे परिणाम दीर्घकाळ टिकतात.