या आठवड्यात लेखनप्रवृत्ती व साहित्याशी संबंधित काेणतीही प्रवृत्ती चांगल्या प्रकारे पार पाडू शकाल. यासाठी याेजनाही बनवू शकाल. सरकारी कामात परिस्थिती काहीशी प्रतिकूल जाणवेल. स्वजन, मित्रांसाेबत पार्टी वा पिकनिकचे आयाेजन हाेईल. यशकीर्तीत वाढ हाेईल.
 
 नाेकरी-व्यवसाय : या आठवड्यात प्रवासाद्वारे तुम्ही तुमचा फायदा वाढवू शकता. व्यावसायिक विषयांत जाेडीदाराचा सल्ला घेऊ शकता. तुमच्या पद व उत्पन्न दाेहाेंत वृद्धी करू शकता. याशिवाय या वेळी तुमच्या भागीदारांसाेबत तणावाची स्थिती बनू शकते.
 
 
नातीगाेती : या आठवड्यात तुम्ही तुमच्या दांपत्य जीवनातील आनंदात भर घालू शकता. कुटुंबात तुमच्या यशामुळे आनंदाचे वातावरण असू शकते. तुम्ही तुमचा आनंद साजरा करण्यासाठी कुटुंबासाठी विशेष खर्च कराल. या वेळी तुमचे तुमच्या आईशी संबंध सुधारू लागतील.
 
 आराेग्य : या आठवड्यात तब्येत सामान्य राहील. फ्नत कामाच्या दगदगीमुळे थाेडा थकवा सतावू शकताे. आईच्या तब्येतीची काळजी घ्यावी. महिलांनी स्वत:च्या तब्येतीकडे लक्ष द्यावे. कारण माेसमी बदल त्यांना आतून शिणवू शकताे.
जीवनशैलीत सात्त्विकता सामील करावी.
 
 शुभदिनांक : 02, 03, 06
 
  शुभरंग : भुरा, नारंगी, काळा
 
  शुभवार : बुधवार, शुक्रवार, शनिवार 
 
 दक्षता : या आठवड्यात काेणत्याही बाबतीत आततायीपणा करू नय. भाैतिकतेत गुंतून राहू नये.
 
 उपाय : या आठवड्यात रविवारी दुपारी तांबड्या गाईला दाेन्ही हातांच्या ओंजळीत गहू भरून खाऊ घालावेत.