120 वर्षांची जुनी याट ‘शेनांडाेह ऑफ शार्क’ 80 काेटी रुपयांना विकणार

    29-Aug-2022
Total Views |
 
 

yat 
इटलीची 120 वर्षांपूर्वी 1902 मध्ये तयार केलेली ‘शेनांडाेह ऑफ शार्क’ नावाची सेलिंग याट विकायची असून, या याटची किंमत 80 काेटी रुपये असल्याचे या याटचे मालक फ्रॅन्सेस्काे मिशेली यांनी सांगितले. ही सेलिंग याट गेल्या 120 वर्षांपासून समुद्रात प्रवास करत आहे. या याटचा वेग ताशी 12 नाॅट (22 किलाेमीटर) आहे. आजदेखील ही याट ताशी 9 नाॅट वेगाने 3,250 नाॅटिकल मैल प्रवास करू शकते. काही दिवसांपूर्वी इटलीच्या ‘काेस्टा स्मेराल्डा’मध्ये आयाेजित केलेल्या सुपरयाट रेगाटामध्ये भाग घेण्यासाठी ही आणली असून, या याटचा फाेटाे काढण्यासाठी व ही याट पाहण्यासाठी माेठी गर्दी उसळली हाेती.