मिथुन

    22-Aug-2022
Total Views |
 
 

Horoscope 
 
हा आठवडा तुमच्यासाठी मध्यम फलदायी असणार आहे. तुम्हाला एखाद्या संपत्तीच्या व्यवहारातून फायदा हाेण्याची श्नयता आहे. तुम्हाला काही प्रमाणात धनलाभाची श्नयता आहे. तुम्ही सांगीवांगी गाेष्टींकडे लक्ष न देता स्वत:च्या कामावर लक्ष देण्याची गरज आहे. प्रवासयाेग असून प्रवास उत्तम घडेल.
 
नाेकरी-व्यवसाय : या आठवड्यात शेती, वाहन, मशिनरीच्या कामकाजाद्वारे तुमच्या कामात वाढ करू शकाल. नाेकरदार हाती आलेली कामे उत्साहाने पार पाडू शकतील; पण कामात सावध राहावे. काेणतीही नवी सुरुवात करताना दक्षता घ्यावी. तुमच्या कार्यशैलीत बदल हाेण्याचीही श्नयता आहे.
 
नातीगाेती : या आठवड्यात प्रेमसंबंधात सुरुवातीलाच तुमच्या भेटीगाठी वाढणार आहेत; पण उत्तरार्धात तुमच्यातील अहंभावना व नात्यातील वर्चस्वाची प्रवृत्ती तुमच्यात दुरावा वाढवू शकते. दांपत्यसुखासाठी हा आठवडा उत्तम आहे.मित्रांसाेबत कम्युनिकेशनची श्नयता प्रबळ आहे.
 
आराेग्य : या आठवड्यात तुम्ही तुमच्या तब्येतीकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे. सुरुवातीला अचानक माेसमी समस्यांच्या तावडीत सापडू शकता.याशिवाय वाहन, आग व पाण्यापासून जपावे. डाेळ्यांचा त्रास व कानासंबंधी तक्रारी राहतील. काेणत्याही समस्येचे कारण निदानास उशीर असू शकते.
 
शुभदिनांक : 21,24, 25
 
शुभरंग : पांढरा, काळा, जांभळा
 
शुभवार : बुधवार, गुरुवार, शनिवार
 
दक्षता : या आठवड्यात नवा आर्थिक उद्याेग सुरू करण्यासाठी इतरांवर अवलंबून न राहता स्वत:च्या बळावर पुढे जा.
 
उपाय : या आठवड्यात सूर्याला पाण्यात साखर मिसळून अर्घ्य द्या