कर्क

    22-Aug-2022
Total Views |
 
 

Horoscope 
 
तुमच्यासाठी अनेक बाबतीत हा आठवडा चांगला राहणार आहे. तुमच्या कमाईत जबरदस्त वाढ हाेणार आहे. ज्यामुळे तुमच्या बऱ्याच समस्या कमी हाेतील. तुमचे खर्चही आटाेपशीर राहणार आहेत. तुम्ही बँक लाेन घेऊन एखादे नवे काम सुरू करू शकता. अपरिचितावर जास्त विश्वास ठेवू नये.
 
नाेकरी-व्यवसाय : या आठवड्यात विशेषकरून भागीदारीच्या धंद्यात वा कार्यस्थळावरील संयु्नत कामात काेणताही बदल करण्यासाठी विचारपूर्वक पावले टाका. इतरांवर विसंबण्याऐवजी आत्मविश्वासाने पुढे जा. ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. शेअर वा सट्टा बाजारात घाईने निर्णय घेऊ नका.
 
नातीगाेती : या आठवड्यात तुम्ही प्रेमसंबंधातील संभाषणात स्वत:च्या स्वभावात संयम बाळगावा. श्नयताे जास्त कठाेर शब्दांचा वापर करू नये. अन्यथा तुमच्या संबंधात दुरावा निर्माण हाेऊ शकताे. तुम्हाला सध्या संबंधाची स्थिती अनुकूल राखावी लागेल. दांपत्यजीवनात जाेडीदाराचे अधिपत्य साेसावे लागेल.
 
आराेग्य : या आठवड्याची सुरुवात चांगली असणार आहे; पण डाेळ्यांचा त्रास, कान-दात दुखणे, च्नकर, अस्वस्थता इ. संकेत मिळत आहेत.त्वचेत जळजळ वा इतर एखादी समस्या असल्यास जास्त जपावे लागेल.गर्भवतींनी जास्त काळजी घेण्याची गरज आहे.
 
शुभदिनांक : 22, 23, 27
 
शुभरंग : काळा, जांभळा, नारंगी
 
शुभवार : रविवार, मंगळवार, शुक्रवार
 
दक्षता : या आठवड्यात वारसासंपत्तीसंबंधित एखादा त्रास हाेण्याची श्नयता आहे
 
उपाय : या आठवड्यात शनिवारी काळ्या वस्तू दान कराव्यात