कुंभ

    22-Aug-2022
Total Views |
 
 

Horoscope 
 
या आठवड्यात तुम्ही प्रवास-पर्यटनाचे आयाेजन करू शकता. नव्या विचार व कामात नव्या रचनात्मकतेने तुम्हाला सुरुवातीला तुमचे काैशल्य दाखवण्याची संधी मिळू शकते. तुम्ही तुमच्या नात्यांमध्ये समर्पण व पारदर्शकता वाढवावी.तुम्ही विचारांत अडकून राहाल. आध्यात्मिक रुची वाढेल.
 
नाेकरी-व्यवसाय : या आठवड्यात तुम्हाला व्यवसाय आणि करिअरबाबत संमिश्र फळ मिळताना दिसत आहे. सुरुवातीला तुमचा उत्साह उत्तम राहील.वरिष्ठांसाेबतच्या संबंधाकडेही लक्ष देण्याची गरज आहे. धंद्यात ग्राहक वा आपल्यासाेबत काम करणाऱ्या लाेकांशी बाेलताना रागावर ताबा ठेवावा.
 
नातीगाेती : हा आठवडा प्रेम आणि संबंधाबाबत फलदायी राहील. तुमच्यामध्ये एखााद्या खास व्यक्तीबद्दल आकर्षण राहात असल्यामुळे जुन्या संबंधांत तणाव उत्पन्न हाेण्याची श्नयता आहे. फ्नत प्रेमसंबंधच नव्हे, तर इतर सर्व नातेसंबंधही तणावात येण्याची श्नयता दिसून येत आहे.
 
आराेग्य : या आठवड्यात तुम्ही तुमच्या तब्येतीकडे लक्ष देण्याची गरज आहे.तुम्हाला काेणत्या ना काेणत्या कारणामुळे मानसिक चिंता आणि अस्वस्थतेचा अनुभव येईल. पचनासंबंधित समस्या, डायबिटीस, मांड्या कंबरेत वेदना, हृदयाची धडधड अनियमित हाेणे, बद्धकाेष्ठता असा त्रास संभवताे.
 
शुभदिनांक : 21, 24, 25
 
शुभरंग : पिवळा, लाल, पांढरा
 
शुभवार : मंगळवार, शुक्रवार, शनिवार
 
दक्षता : या आठवड्यात नवा आर्थिक उद्याेग सुरू करण्यासाठी इतरांवर अवलंबून न राहता स्वत:च्या बळावर पुढे व्हा.
 
उपाय : या आठवड्यात सुंदरकांडचा पाठ करा.