कन्या

    22-Aug-2022
Total Views |
 
 
 
 

Horoscope 
 
या आठवड्यात तुम्ही ऊर्जेने ओतप्राेत राहाल. प्रवासाला जाण्यासाठी खूपच चांगला आठवडा आहे. तुम्ही तुमचा बँकबॅलन्स उत्तम प्रमाणात वाढवू शकता.तुमच्या उत्पन्नात जबरदस्त वाढ हाेईल आणि तुम्ही खूप आत्मविश्वासाने जीवनातील कामे संपन्न करू शकाल.
 
नाेकरी-व्यवसाय : नाेकरी-व्यवसायात तुम्ही या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच उत्साहाने काम कराल. तुमचे कामकाज याेजनेनुसार पूर्ण हाेत राहिल्यामुळे उत्तराेत्तर तुमचा आत्मविश्वास वाढत राहील. या आठवड्यात धंद्यात तेजी येण्याची अपेक्षाही बाळगू शकता.
 
नातीगाेती : या आठवड्यात नव्या मित्रांसाेबत तुमची मैत्री वाढेल पण यामध्ये कुठे ना कुठे अनिश्चिततेची शंकाही तुमच्या मनात येत राहील. तुम्ही जुने संबंध संपवून नव्या संबंधाची सुरुवात कराल वा सध्याच्या संबंधात आमूलाग्र बदलाची श्नयता आहे. विवाहितांचे दांपत्यजीवन सुखावह राहील.
 
आराेग्य : या आठवड्यात तुमचे आराेग्य उत्तम राहणार आहे, पण विशेषकरून अ‍ॅसिडिटी, पायांचे स्नायू दुखणे, तळपायांची जळजळ वा त्वचा फुटणे इ.समस्या हाेण्याची श्नयता आहे. खाण्यापिण्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. तसेच पुरेशी विश्रांती घ्यावी. कारण माेसमी समस्यांची श्नयता आहे.
 
शुभदिनांक : 21, 24, 25
 
शुभरंग : जांभळा, नारंगी, पांढरा
 
शुभवार : बुधवार, गुरुवार, शुक्रवार
 
दक्षता : तुमच्यासाेबत काम करणाऱ्यांपैकी काहीजण फसवू शकतात. त्यामुळे दक्षता बाळगावी.
 
उपाय : या आठवड्यात सरसू तेलात स्वत:चे प्रतिबिंब पाहून छाया दान कराव