वृषभ

    22-Aug-2022
Total Views |
 
 

Horoscope 
 
हा आठवडा तुमच्यासाठी तुमच्या इच्छेनुरूप राहील. तुमच्या काही याेजना सफल हाेऊन तुमच्या यशाचा मार्ग प्रशस्त करतील. एखादे नवे धाेरण अवलंबण्याची गरज भासेल. तुमच्या याेजनांनुसार आर्थिकदृष्ट्या हा आठवडा प्रगती देणारा राहील. तुम्हाला अनेक विषयांची माहिती मिळवून त्यात पुढे जाण्याची संधी मिळेल.
 
नाेकरी-व्यवसाय : या आठवड्यात तुमच्या हाती पैसा असल्यास त्यानुसार व्यवसायविस्तार तुमच्या प्राेड्नटच्या गुणवत्तेसाठी रिसर्च, नव्या धंद्याची सुरुवात ही कामे करू शकाल. मल्टिनॅशनल कंपनीसंबंधित कामांना थाेडा उशीर लागू शकताे. सावधानता तुमच्यासाठी सर्वांत माेठे शस्त्र राहील.
 
नातीगाेती : या आठवड्यात तुमच्या संबंधांत माधुर्य राहील पण तुम्ही तुमच्या वागण्या-बाेलण्यावर ताबा ठेवावा. विवाहितांनी सध्या जाेडीदाराशी ताळमेळ वाढवणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे उभयतांमध्ये आपसात विश्वास राखून ठेवावा. कार्यस्थळी विशिष्ट व्य्नतीसाेबत जवळीक वाढू शकते.
 
आराेग्य : या आठवड्यात जास्त विचारांमध्ये हरवून राहिल्यामुळे तुम्हाला मानसिक व्यग्रता राहील. पहिल्या दिवशी तर जाेम राहील. मधुमेह, र्नतदाबाचा त्रास असल्यास शरीरात थाेडी अस्वस्थता राहू शकते. अस्वस्थतेचे कारण तुम्ही जाणू शकणार नाही. अचानक दुखापत, अ‍ॅसिडिटी इ. समस्या असू शकतात.
 
शुभदिनांक : 21, 24, 25
 
शुभरंग : पिवळा, लाल, पांढरा
 
शुभवार : रविवार, साेमवार, मंगळवार
 
दक्षता : कुटुंबीयांशी वादाची श्नयता असल्याने समाधानकारक धाेरण ठेवावे.
 
उपाय : या आठवड्यात हनुमंताची आराधना आणि बजरंग बाणाचा पाठ करावा. शनिवारी छायादान करावे.