वृश्चिक

    22-Aug-2022
Total Views |
 

Horoscope 
 
या आठवड्यात शांत चित्ताने सारी कामे केल्यास प्रत्येक काम यशस्वी हाेत राहील. तुमच्या कामाचे उत्तम परिणाम तुम्हाला मिळतील. तुमची मेहनत जबरदस्त पद्धतीने तुमच्या बाजूने काम करील. तुम्हाला नवनवीन लाेकांना भेटल्यामुळे आणि त्यांच्यासाेबत काम केल्यामुळे माेठे फायदे हाेतील.
 
नाेकरी-व्यवसाय : या आठवड्यात प्राेफेशनल आघाडीवर स्पर्धांमध्ये वा शत्रूंवर विजय मिळेल तसेच तुमची बाैद्धिक प्रतिभा उत्तम राहील. नव्या उद्याेगाची सुरुवात करण्यास थाेडा उशीर हाेईल; पण तुमच्यात नवी सुरुवात करण्याची तत्परता जास्त राहील. भागीदारीच्या कामात खूप सावध राहाल.
 
नातीगाेती : या काळात काैटुंबिक सदस्यांशी महत्त्वाच्या विषयांवर एकमत हाेऊ शकणार नाही. तुम्हीही काैटुंबिक समस्या साेडवण्याऐवजी रागाने वागाल.प्रेमसंबंधासाठी उत्तम आठवडा. आईशी बिघडणारे संबंध सुधारण्याचा प्रयत्न करा.
 
आराेग्य : हा आठवडा आराेग्याच्या दृष्टीने सामान्य काळ आहे. पण विशेषकरून दातदुखी, नाक-कान-घशाचा त्रास असू शकताे. वा खांद्याचे स्नायू दुखू शकतात. पूर्वीपासून अशी एखादी समस्या असेल, तर सुटका हाेण्यास उशीर लागेल पण उपचाराचा परिणाम हळूहळू दिसू लागेल.
 
शुभदिनांक : 22, 23, 27
 
शुभरंग : काळा, जांभळा, लाल
 
शुभवार : मंगळवार, बुधवार, शनिवार
 
दक्षता : या आठवड्यात काेणताही माेठा निर्णय केवळ हट्टापायी घेऊ नये.
 
उपाय : या आठवड्यात शंकराला अक्षता वाहाव्यात व शिवलिंगावर अभिषेक करावा.