धनू

    22-Aug-2022
Total Views |
 
 
Horoscope
 
या आठवड्यात तुमच्या कामकाजात तुमच्या इच्छेप्रमाणे प्रगती हाेईल. तुम्ही एकांतात राहणे जास्त पसंत कराल. काेणताही निर्ण घेणे टाळा. तुम्ही तुमच्या काेणत्याही समस्येच्या निवारणासाठी समाधानकारक मार्ग अवलंबाल. तुम्ही चातुर्याने आणि दक्षतेने पुढे जाण्याची गरज आहे.
 
नाेकरी-व्यवसाय : या आठवड्यात प्राेफेशनल आघाडीवर तुमचे मन कामकाजात थाेडे कमी लागेल; पण दाेन दिवसांनंतर तुमच्यात उत्साह व काम करण्याची जाण उत्तम राहिल्यामुळे तुम्ही पुढे जाऊ शकाल. तुमच्या वाणीचा प्रभाव उत्तम राहील. तुम्हाला कामगार वर्गाची उत्तम साथ मिळेल.
 
नातीगाेती : या आठवड्यात प्रियजनांसाेबतच्या तुमच्या संबंधात जवळीक असल्यामुळे तुम्हाला नम्रता ठेवायला हवी. याशिवाय माैल्यवान गिफ्ट देऊनही त्याला खूश ठेवण्यासाठी तुम्हाला खर्च करावा लागू शकताे. तुमच्या जीवनात अपरिचितांचे आगमन हाेईल व तिच्यासाेबत तुमची जवळीक वाढेल. हा आठवडा तुमच्यासाठी काैटुंबिक सुखसमृद्धीने भरलेला राहणार आहे.
 
आराेग्य : या आठवड्यात ताेंडात व्रण, घशात खवखव आणि वेदना असू शकतात.काैटुंबिक त्रासामुळे तुम्ही तणावात राहाल. यामुळे आराेग्यही बिघडू शकते. पाणी व फळांचा ताजा ज्यूस, दूध-दही-ताक, लिंबूपाणी, शहाळे असे द्रवपदार्थ खूप प्या.यामुळे शरीरात पाणी कमी राहणार नाही. त्वचेवर चमक येईल.
 
शुभदिनांक : 22, 23, 27
 
शुभरंग : पिवळा, गुलाबी, लाल
 
शुभवार : रविवार, साेमवार, मंगळवार
 
दक्षता : या आठवड्यात इतरांवर विसंबून न राहता धैर्याने काम करावे.
 
उपाय : हिरव्या रंगाचे कपडे व बांगड्या भेट द्याव्यात.