सिंह

    22-Aug-2022
Total Views |
 
 

Horoscope 
या आठवड्यात तुम्ही प्राेफेशनल जीवनात कठाेर परिश्रम चालू ठेवाल. यामुळे तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळण्याची पूर्ण श्नयता आहे. तुम्हाला तुमच्या हाताखालील व सहकारी मंडळींचे पूर्ण समर्थन मिळेल. तुम्हाला एकाचवेळी अनेक चिंता असतील. ज्याचा तुम्ही याेग्यप्रकारे विचार करावा.
 
नाेकरी-व्यवसाय : या आठवड्यात नाेकरी करणारे कर्मचारी आपल्या कुशलतेत खूप चांगली प्रगती करू शकतील; पण आपल्या कामाचे ओझे कमी करण्यासाठी त्यांना जास्त परिश्रम करावे लागतील. त्यामुळे नाेकरी बदलण्याचा विचारही मनात येऊ शकताे. नव्या व्यवसायासाठी रूपरेषा तयार करू शकता.
 
नातीगाेती : या आठवड्यात नवे संबंध, खास व्य्नतींसाेबत भेटीगाठीची श्नयता दिसून येते. तुम्ही तुमच्या बाेलण्याच्या प्रभावाने खास व्य्नतीला तुमच्याकडे आकर्षित करू शकता. तसा प्रेम व्य्नत करण्यात घाईगडबड करण्याची वा जास्त उत्साह न दाखवण्याची गरज आहे.
 
आराेग्य : या आठवड्याच्या सुरुवातीला तुमचे आराेग्य उत्तम राहील; पण उत्तरार्धात विशेषकरून मान दुखणे, त्वचेत जळजळअ अशा समस्या तुम्हाला सतावण्याची श्नयता आहे. कंबरेची समस्या असल्यास विशेष लक्ष देण्याची गरज आहे. सर्दी-कफ असल्यास बेपर्वा राहू नये.
 
शुभदिनांक : 22, 24, 27
 
शुभरंग : लाल, पांढरा, पिवळा
 
शुभवार : रविवार, साेमवार, मंगळवार
 
दक्षता : या आठवड्यात विचार न करता पैसा गुंतवू नये. अन्यथा फायद्याऐवजी ताेटा हाेऊ शकताे.
 
उपाय : या आठवड्यात काळ्या वस्तू दान कराव्यात.