मकर

    22-Aug-2022
Total Views |
 
 

Horoscope 
 
या आठवड्यात कामानिमित्ताने तुमची धावपळ हाेऊन तणाव वाढू शकताे.काही महत्त्वाच्या कामांमध्ये अडथळेही येण्याची श्नयता आहे. काही कामे वेळेत पूर्ण न झाल्यामुळे तुम्ही त्रस्त हाेऊ शकता; पण आठवडाअखेर काही महत्त्वाची कामे पूर्ण झाल्यामुळे तुमचा मूड उत्तम राहील.
 
नाेकरी-व्यवसाय : या आठवड्यात व्यावसायिक क्षेत्रात तुम्ही यश मिळवू शकाल. भागीदारीतील उद्याेग, भागीदारी, नवे करार यामध्ये उशिरा पण यश मिळण्याची अपेक्षा बाळगू शकता. तुमचा परफाॅर्मन्स अपेक्षित पातळीपेक्षा काहीसा कमी हाेण्याची श्नयता आहे. तरीही तुमचे यश निश्चित असेल.
 
नातीगाेती : या आठवड्यात लव्हलाइफमध्ये संबंधाचे खरे महत्त्व समजाल आणि जीवनात एकमेकांच्या गरजांना जास्त समजून घेत संबंध घनिष्ट बनवण्याचा प्रयत्न कराल. तुम्ही या काळात कम्युनिकेशनवर लक्ष द्याल. थाेडे लक्ष दिले तरी संबंधात खास अडचण येणार नाही.
 
आराेग्य : या आठवड्याच्या सुरुवातीला तुमचे आराेग्य उत्तम राहील; पण मधल्या काळात तुम्हाला त्रास हाेण्याची श्नयता आहे. माेसमी समस्यांमध्ये तुम्ही अडकण्याची श्नयता आहे. डाेळ्यांमध्ये जळजळ, कंबरदुखी, पाठीच्या कण्यासंबंधित तक्रारही असण्याची श्नयता आहे.
 
शुभदिनांक : 21, 24, 25
 
शुभरंग : भुरा, नारंगी, काळा
 
शुभवार : बुधवार, शुक्रवार, शनिवार
 
दक्षता : या आठवड्यात माैजमस्ती व अवाजवी कारणांवर खूप खर्च करणे टाळावे.
 
उपाय : या आठवड्यात पांढरी मिठाई दान करावी. शनिवारी मुंग्यांना पीठ टाकावे व गाेमातेची सेवा करावी.