मेष

    22-Aug-2022
Total Views |
 

Horoscope 
या आठवड्यात तुम्हाला नशिबाचा आधार मिळेल. तुमची कमाई मर्यादित राहण्याची श्नयता आहे. काही नव्या लाेकांसाेबत काम करण्याची संधी मिळेल. त्यामुळे तुमची टीम वाढू शकते. तुमच्या पालकांकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. कारण या वेळी त्यांना तुमची जास्त गरज असणार आहे.
 
नाेकरी-व्यवसाय : या आठवड्यात प्राेफेशनल आघाडीवर विशेष करून एखाद्याशी चर्चा, मीटिंग, तसेच कम्युनिकेशनमध्येही लक्ष देण्याची गरज आहे.कामकाजात थाेडा उशीरही लागू शकताे; पण तुम्ही जे काम कराल त्यामध्ये जास्त स्थैर्य आणि भ्नकमपणा आणण्यासाठी काळ उत्तम आहे.
 
नातीगाेती : या आठवड्यात तुमचे मन काही नकारात्मक विचारांत व कामकाजातील त्रासात गुरफटलेले राहिल्यामुळे तुम्ही नात्यांकडे कमी लक्ष देऊ शकाल; पण बुधवारी सायंकाळी तुमच्यात सकारात्मकता संचारेल व त्यानंतर ग्रहांची स्थिती पाहता तुम्ही राेमँटिक मूडमध्ये जास्त राहाल.
 
आराेग्य : या आठवड्याच्या सुरुवातीला तब्येतीकडे विशेष लक्ष द्यावे.विशेषकरून निद्रानाश आणि मानसिक अस्वस्थता राहण्याची श्नयता आहे. याशिवाय मूळव्याध, र्नताभिसरणासंबंधित तक्रारी, अचानक पाेटाची उष्णतेसंबंधित समस्या, त्वचेत जळजळ वा खाज अशा समस्या उद्भवू शकतात.
 
शुभदिनांक : 22, 26, 27
 
शुभरंग : गुलाबी, लाल, पांढरा
 
शुभवार : रविवार, मंगळवार, गुरुवार
 
दक्षता : या आठवड्यात मनावर मानसिक तणाव वाढू देऊ नका.
 
उपाय : या आठवड्यात राेज गायीला भाकरी द्या व शनिवारी पिंपळाला पाणी वाहा.