अंध स्केटरने हवेत 142 वेळा उड्या मारून बनविले नवीन रेकाॅर्ड

    02-Aug-2022
Total Views |
 
 

Sketting 
जपानी स्केटबाेर्डर रयूसी ओचीने न पाहताच स्केटबाेर्ड ओलीज करण्याचे (स्केटबराेबर हवेत उडी मारणे) रेकाॅर्ड बनविले. त्याने एका मिनिटात डाेळ्यांवर पट्टी बांधून सर्वांत जास्त 142 स्केटबाेर्ड ओलीज करण्याचे रेकाॅर्ड ब्रेक केले. रयूसी रेटिनाइटिस पिगमेंटाेसाने पीडित आहे. हा राेग वाढल्यास दृष्टी जाते. त्याची सुद्धा 95% दृष्टी गेली आहे आणि ताे जवळपास पूर्णपणे अंध आहे.
रयूसीने रेकाॅर्ड ब्रेक करण्याचा प्रयत्न सैतामाच्या एका इनडाेअर स्केटबाेर्ड पार्कमध्ये केला. त्याने स्केट पार्कमध्ये हातात एक पांढरी काठी पकडून ठेवली हाेती. ज्यामुळे ताे स्वत:ला दिशा देऊ शकेल. रयूसीने सांगितले की, ‘मी जेव्हा 14 वर्षांचा हाेताे, तेव्हा आपल्या मित्राच्या घरी गेलाे हाेताे. त्याच्याजवळ एक स्केटबाेर्ड हाेता. ताे मी वापरून पाहायचे ठरविले. त्यानंतर मी नवीन काैशल्य शिकण्यासाठी अनेक दिवस आणि महिने प्रॅ्नटीस केली. काही वर्षांनंतर दृष्टी कमी हाेऊ लागली. आई-वडील सुद्धा माझ्या स्केटबाेर्डिंगच्या विराेधात हाेते. पण तसे असले तरीही मी शिकणे सुरूच ठेवले.’