पावसाळ्यात असा करा मेकअप...

    02-Aug-2022
Total Views |


Raining
रिमझिम पाऊस हा एकीकडे उन्हाने त्रस्त झालेल्यांना एक आगळाच आनंद देताे. आपण थाेडीफार काळजी घेतली असता, पावसाचा आनंद तर घेऊ शकताेच, त्याचप्रमाणे आपल्या साैंदर्यातही भर टाकू शकताे.
केशरचना : पावसाळ्यात हवेमध्ये दमटपणा जास्त असल्याने विशेष प्रकारची केशरचना अधिक काळ टिकून राहू शकत नाही. अशावेळी तुम्ही साधी वेणी वगैरे घालावी. अशा माेसमात श्नयताे राेलर सेटिंग, ड्रायर सेटिंग, इले्निट्रक राॅड या आधुनिक पद्धतींचा वापर करू नये.
चेहऱ्यावरील मेकअप : पावसाळ्यात चेहऱ्यावर मुरुमं हाेतात, म्हणून श्नयताे क्रीमचा अनावश्यक वापर टाळावा. पावडरचा मेकअप पावसामुळे खराब हाेताे. म्हणूनच अगदी साैम्य मेकअप करावा. तसेच या माेसमात स्टीकरची टिकली व लिपस्टिकचा वापर कुंकवाच्या ठिकाणी करावा. अन्यथा पावसाच्या पाण्यामुळे साधी टिकली व कुंकू तर पुसून जाईलच शिवाय तुमच्या कपड्यांवर त्याचे डाग पडतील.
पेहराव : पावसाळ्यात चुकूनही जरीचे अथवा सिल्कचे कपडे घालू नयेत. कारण ते ओले हाेताच शरीराला चिकटतात. तुम्ही असा ेशाख वापरावा, जाे पावसात भिजल्यावरही आकसत नाही. शरीराला चिकटत नाही. जसे सिंथेटिक कपडे, टेरिलीन, नायलाॅन व काॅटन इत्यादी.
पर्स : जर तुम्ही नाेकरदार स्त्री असाल, तर पर्स घेणे तुम्हाला गरजेचे आहे. म्हणून त्यासाठी पर्समध्ये नेहमी एक पाॅलिथीनची पिशवी ठेवावी.पाऊस आला तर पटकन पर्स पाॅलिथीनच्या पिशवीत टाकून तुम्ही निश्चिंत हाेऊ शकता.