काेमट पाणी पिण्याचे फायदे

    02-Aug-2022
Total Views |
 
 

Health 
 
आराेग्याशी संबंधित अनेक समस्यांवर उपाय ्नत पाणी आहे.निराेगी राहण्यासाठी डाॅक्टरही भरपूर पाणी पिण्याचा सल्ला देतात.
दातदुखीवरायदेशीर: तुम्हाला दात आणि हिरड्या दुखण्याचा त्रास हाेत असेल, तर राेज सकाळी काेमट पाणी पिण्याची सवय लावा. यामुळे तुमचे दात दीर्घकाळ निराेगी राहतील आणि सूज दूर हाेईल.गरम पाणी पिताना नेहमी लक्षात ठेवा की, पाणी जास्त गरम हाेणार नाही.असे झाल्यास दातांच्या इनॅमलला इजा पाेहाेचू शकते.
 
पचनासाठी उपयु्नत: तुम्हाला दरराेज बद्धकाेष्ठताआणि अपचनाचा त्रास हाेत असेल, तर तुम्ही तुमच्या खाण्यापिण्यात काही बदल करावेत. सर्वप्रथम, पिण्याच्या नित्यक्रमात काेमट पाण्याचा समावेश करून पाहा. गरम पाणी पिण्यामुळे र्नतवाहिन्यांचा विस्तार हाेताे आणि आतड्यांमधला र्नतप्रवाह वाढताे, ज्यामुळे पचनसंस्था अधिक चांगले काम करते. गरम पाण्याच्या सेवनाने अ‍ॅसिडिटीचा त्रास हाेत नाही.काेमट पाणी प्यायल्याने शरीराचे तापमान वाढते आणि शरीराला जास्त घाम येताे. शरीरातील हानिकारक विषारी घटक घामाद्वारे शरीरातून सहज बाहेर काढले जातात. लिंबू किंवा ग्रीन-टीसाेबत काेमट पाणी प्यायल्यास शरीरातील हे विषारी पदार्थ सहज निघून जातात.
 
वेदनांपासून आराम: पाेटदुखी, डाेकेदुखी किंवा शरीराच्या काेणत्याही स्नायूमध्ये दुखत असेल, तर काेमट पाण्याचा आहारात समावेश करावा. हे प्यायल्याने केवळ दुखण्यापासून आराम मिळत नाही, तर स्नायूंच्या सूजमध्येही आराम मिळताे.दिवसभरातून किती पाणी प्यायला हवं? प्रत्येकाचे शरीर वेगळे असते आणि अशा परिस्थितीत पाण्याची गरजदेखील वेगळी असते; पण शरीराच्या वजनानुसार पाणी प्यावे. प्रत्येक व्य्नतीने 20 किलाे वजनानुसार एक लिटर पाणी प्यावे, असे अनेक संशाेधनांतून समाेर आले आहे. उदाहरणार्थ, तुमच्या शरीरात 70 किलाे वजन असेल, तर 20 किलाेच्या एका लिटरनुसार तुम्ही 3.5 लिटर पाणी प्यावे. वजन 80 किलाे असेल, तर 4 लिटर पाणी प्यावे.