भुकेची जाणीव हाेण्यामागे असते ‘लेप्टिन’ हे संप्रेरक

    19-Aug-2022
Total Views |
 
 
संध्यानंद.काॅम
 

hunger 
 
अन्न-वस्त्र-निवारा या माणसाच्या प्राथमिक गरजा आहेत आणि त्यातसुद्धा अन्न ही अगदी मूलभूत गरज असल्याने ती प्रथम क्रमांकावर आहे. वस्त्र आणि निवारा अपुरा, थाेडा कमी असला तरी भागेल; पण अन्नाविना फार काळ राहता येत नाही. भूक ही भावना आपल्याला काही खाण्याची जाणीव करून देते. पण, काही लाेकांना खाण्याचे एवढे आकर्षण का असते याचा विचार केला आहेत का? आपण केला नसला, तरी शास्त्रज्ञांनी त्याचा विचार केला आणि त्याचे उत्तरही मिळविले. केम्ब्रिज विद्यापीठातील डाॅ. सदफ फारुख आणि डाॅ.पाॅल फ्लेचर यांनी याबाबत नुकतेच एक संशाेधन केले. भाेजनाबाबत रुची निर्माण करण्यात ‘लेप्टिन’ नावाच्या एका संप्रेरकाची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांना आढळले. आपल्याला किती खावयाचे आहे, पुरेसे खाल्ले गेले आहे का आणि जेवणातील काेणते पदार्थ आपल्याला आवडले आहेत याची जाणीव या संप्रेरकामुळे हाेते.
 
या संदर्भातील संशाेधनासाठी आनुवंशिक विकार असलेल्या काहींचा अभ्यास करण्यात आला. या लाेकांमध्ये ‘लेप्टिन’चा पूर्ण अभाव हाेता. असे लाेक भरपूर खात हाेते आणि काेणत्याही प्रकारचे पदार्थ त्यांना वर्ज्य नव्हते. पण, त्यांच्यावर ‘लेप्टिन’द्वारे उपचार केले गेले तेव्हा त्यांची भूक कमी झाली आणि ते निवडकच पदार्थ खायला लागले. या लाेकांच्या मेंदूंतील घडामाेडींवर फं्नशनल मॅग्नेटिक रिसाेनेन्स इमेजिंगच्या तंत्राद्वारे लक्ष ठेवले गेले. तुम्हाला आज काेणते पदार्थ दिले जातील हे सांगितले गेले आणि ते सांगितल्यावर या लाेकांच्या मेंदूंत काय हालचाली हाेतात हे तपासले गेले. खाद्य पदार्थांची चित्रे पाहिल्यावर, माेटारी, झाडे आणि नाैकांची चित्रे पाहिल्यावर या लाेकांच्या मेंदूंतील हालचालींची तुलना केली गेली.
 
या चित्रांमध्ये चाॅकलेट, केक, स्ट्राॅबेरी आणि पिझ्झासारखे जिभेला आकर्षित करणारे काही पदार्थ हाेते.समाजात अतिखाणाऱ्यांची संख्या कमी नाही. असे लाेक खायला बसले, की खातच सुटतात. आपण किती आणि काय खाताे आहाेत याची जाणीव त्यांना हाेत नाही आणि ‘ढेरपाेट्या’ म्हटल्यावर त्यांना राग येताे. पण, इटलीतील एका शल्यविशारदाने ‘स्टमक पेसमेकर’ नावाचे उपकरण तयार केले असून, अतिखाण्यापासून त्यामुळे लांब राहता येईल. चार ग्रॅम वजन आणि सिगारेट लायटरच्या आकाराचे े उपकरण अतिखाण्यातून आलेल्या लठ्ठपणाने त्रस्त असलेल्यांच्या पाेटाच्या आत एका लहानशा शस्त्रक्रियेद्वारे बसविले जाते.
 
या यंत्रासाेबतचा इले्नट्राेड पाेटाच्या बाहेर लावला जाताे. पाेटातील पेसमेकरला हा इले्नट्राेडला संकेत देईल. आतील पेसमेकर संबंधित व्यक्तीने थाेडे खाल्ल्यावर पाेटातील स्नायू फुलवेल आणि त्यामुळे त्या व्यक्तीला आपले पाेट भरल्याचा भास हाेऊन ती खाणे बंद करेल. एका लठ्ठ महिलेवर या उपकरणाचा केलेला प्रयाेग यशस्वी हाेऊन सहा आठवड्यांत तिचे वजन 17 किलाेंनी कमी झाले.
वजन कमी करू इच्छित असलेल्यांसाठी शास्त्रज्ञ वनस्पतिजन्य रसाचा उपाय शाेधत आहेत. हा रस घेतल्यावर दीर्घकाळ भुकेची जाणीव हाेणार नाही.डाएटिंग करणाऱ्यांसाठी हा रस फायद्याचा ठरेल, असा शास्त्रज्ञांचा दावा आहे. वनस्पती, बिया आणि धान्यांमध्ये स्थाैल्याच्या विराेधात लढणारे एक तत्त्व नैसर्गिकरीत्या असते.