राज्यात नऊ हजार पाेलिसांची लवकरच भरती : फडणवीस

    19-Aug-2022
Total Views |

Police
पाेलिस विभागातील नऊ हजार रिक्त पदांवर लवकरच भरतीला सुरुवात हाेणार असून, याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाेबत बैठक झाली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.सिव्हिल लाइन्समधील पाेलिस भवनात स्वातंत्र्याचा अमृत महाेत्सवानिमित्त आयाेजित प्रदर्शनाला उपमुख्यमंत्र्यांनी भेट दिली. त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली. पाेलिसांना चांगले घर मिळावे, यासाठी मुख्यमंत्री व पाेलिस गृहनिर्माण विभागाच्या अधिकाऱ्यांसाेबत बैठक झाली.बहुप्रतीक्षित पाेलिस अधिकाऱ्यांच्या सार्वत्रिक बदल्यांबाबत खातेवाटपानंतर विचार करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. पाेलिस आयुक्त अमितेशकुमार, सह आयुक्त अस्वती दाेरजे, अतिरिक्त आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, निवा जैना आदी या वेळी उपस्थित हाेते.