सदर्न कमांडमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात

    17-Aug-2022
Total Views |
 
 

command 
 
लष्कराच्या दक्षिण मुख्यालयात स्वातंत्र्याचा अमृतमहाेत्सव माेठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. राष्ट्रीय युद्ध स्मारकात शहिदांना आदरांजली अर्पण केल्यानंतर उत्साहात ध्वजवंदन करण्यात आले.दक्षिण मुख्यालयातील महाराष्ट्र आणि गाेवा उपविभागाच्या आवारात ब्रिगेडिअर आर.आर. कामत यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. तसेच, ब्रिगेडिअर कामत यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी युद्ध स्मारकात पष्पचक्र अर्पण करत शहिदांना आदरांजली वाहिली. या वेळी अधिकारी, जवान व त्यांचे कुटुंबीय उपस्थित हाेते. या कार्यक्रमानंतर युद्ध स्मारकापासून बाईक रॅली काढण्यात आली. त्यात तीनशे जण सहभागी झाले हाेते. तिरंगा फडकावत निघालेल्या या रॅलीने शांतता व साैहार्दाचा संदेश दिला. काेंढव्यात या रॅलीची समाप्ती झाली.