पाेलिसांसाठी राज्यात माेठ्या प्रमाणात घरे बांधणार

    01-Aug-2022
Total Views |
 

CM 
मुख्यमंत्र्यांची ग्वाही : मालेगावातील पाेलिस निवासस्थानांचे लाेकार्पण कायदा-सुव्यवस्थेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या पाेलिसांसाठी राज्यात माेठ्या प्रमाणात घरांची निर्मिती करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे दिली.मालेगाव उपविभागीय पाेलिस अधिकारी कार्यालय, मालेगाव कॅम्प पाेलिस ठाणे व 205 पाेलिस निवासस्थानांच्या नवीन इमारतींचे लाेकार्पण करताना मुख्यमंत्री बाेलत हाेते. या वेळी आमदार दादा भुसे, आमदार मुफ्ती माेहम्मद इस्माईल अब्दुल खालिक, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, राज्य पाेलिस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक तथा अपर पाेलिस महासंचालक अर्चना त्यागी, नाशिक परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक डाॅ.बी.जी. शेखर पाटील, पाेलिस अधीक्षक सचिन पाटील, नाशिकचे पाेलिस आयुक्त जयंत नाईकनवरे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसाेड आदी यावेळी उपस्थित हाेते.
 
नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 50 हजारांचे प्राेत्साहन अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. पेट्राेल-डिझेलवरील व्हॅट कपात करून पाच रुपयांनी दर कमी करण्यात आला आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांना ग्रीडद्वारे पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रकल्प सुरू करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे.सरकारचा संकल्प लाेकहिताची कामे करण्याचा आहे.नागरिकांच्या प्रश्नांना प्रथम प्राधान्य हे शासनाचे ध्येय आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
 
मालेगाव येथील पाेलिसांसाठीचे 54 काेटी 49 लाख खर्चून सुसज्ज निवासस्थान झाले् आहे. उर्वरित अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी आणखी निवासस्थाने मंजूर करावीत, तसेच, पाेलिस शिपाई भरती करावी, असे भुसे यांनी सांगितले. यावेळी 5 पाेलिस अधिकारीकर्मचाऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात निवासस्थानांच्या किल्ल्या देण्यात आल्या. राज्य पाेलिस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाकडून या इमारतींचे बांधकाम करण्यात आले आहे. यावेळी मालेगाव पाेलिसांच्या ताफ्यातील नवीन चारचाकी वाहनांचे लाेकार्पण हिरवा झेंडा दाखवून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमानंतर महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या काष्टी (ता.मालेगाव) येथील कृषी विज्ञान संकुलाचे भूमिपूजन व काेनशिला अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.