संध्यानंद.काॅम
सतत अपयशाची भीती वाटणाऱ्यांसाठी हे विधान उपयुक्त ठरेल. जीवन म्हटल्यावर त्यात यश-अपयश अशा दाेन्ही घटना येतात हे आपण स्वीकारायला हवे. आज यशस्वी दिसत असलेल्यांनाही केव्हा ना केव्हा अपयशाबराेबर सामना करावा लागला असला, तरी त्यांनी ध्येय गाठण्याचे प्रयत्न साेडले नाहीत आणि आत्मविश्वास कायम ठेवला म्हणून ते आज यशस्वी झाले आहेत हे विसरून चालणार नाही.आपण विचार करू तशी आपली प्रवृत्ती हाेत जाते. काेणत्याही कामाला प्रारंभ करण्यापूर्वी ते यशस्वी हाेणार नाही, असा निराशावादी विचार केलात, तर ते काम चुकीचे हाेणार किंवा हाेणारच नाही हे नक्की. नवे काम करताना अपयशाची श्नयता असली, तरी प्रयत्न करणे तर आपल्या हाती असते.ते प्रामाणिकपणाने केलेत आणि त्याला आत्मविश्वासाची जाेड दिलीत, तर काम चांगले आणि यशस्वी हाेण्याची श्नयता जास्त.‘अपयशावर माझा विश्वास नाही,’ हे तुम्ही एकदा ठरविलेत, तर यश काेठे जात नाही.
त्यासाठी काय करावे ते बघा.
अडथळ्यांना घाबरू नका : काम करताना अडथळे, अडचणी येणार आणि त्याबाबत तक्रारी करून काही फायदा नाही.समस्या काय आहेत हे जाणून घेतलेत, तर त्यावर मात करण्याचा मार्गसुद्धा सापडताे.सर्वंकष विचार केलात, तर आपण कल्पना करत असलेल्या अडचणी निम्म्यासुद्धा नसल्याचे दिसेल. ब्रिटनचे माजी पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी त्यांच्या ‘मॅ्निझम्स अँड रिफ्ले्नशन्स’ या पुस्तकात जनरल ट्युडर या एका लष्करी अधिकाऱ्याचा उल्लेख केला आहे. ट्युडरला 1918 मध्ये जर्मनांच्या आक्रमणाला सामाेरे जावे लागले हाेते. स्थिती प्रतिकूल असली, तरी त्यावर मात करण्याचा आत्मविश्वास त्याच्याकडे हाेता आणि त्यामुळेच ताे टिकून राहिला. हे सांगण्याचा अर्थ एवढाच, की काेणत्याही समस्येपुढे गुडघे न टेकता तिला सामाेरे गेलात, तर मार्ग निघताे आणि तुमचे ध्येय साध्य हाेते.
तळाशी गेलात तरी वर याल : काही वेळा आयुष्यात एवढे अपयश येते, की संबंधित व्यक्ती पार रसातळाला जाते. पण, यापेक्षा खाली जावे लागणार नाही, असा सकारात्मक विचार करा.तळाला गेलेल्यांसाठी वर येणे हाच एक मार्ग असल्यामुळे जिद्द ठेवलीत, तर पुन्हा यश मिळते. तळाला गेलेले आपणच एकमेव आहाेत, असा निराशाजनक विचारही करू नका. कारण, तुमच्यापेक्षा जास्त संकटांना ताेंड देऊन पुन्हा यशस्वी झालेले अनेक लाेक असतात. तुमच्यासारख्याच समस्येला ते सामाेरे गेलेले असतात आणि त्यावर मात करून पुन्हा यशस्वी हाेतात. उलट त्यांच्या प्रयत्नांचे उदाहरण समाेर ठेवा आणि संकटावर मात करा.
सुप्त मनाबराेबर संवाद : माणसामध्ये एक सुप्त मन असल्याचे मानले जाते. त्याच्याबराेबर सकारात्मक संवाद ठेवलात, तर मेंदूलाही तसे चांगले विचार करण्याची सवय लागेल.हे करण्यासाठी आपली भाषा आणि विचार बदलावे लागतील. उदा.मला एखाद्या ठिकाणी पाेहाेचण्यासाठी वेळ लागण्याची भीती वाटते’, ‘रस्त्यात वाहनाचे टायर पं्नचर हाेण्याची श्नयता आहे’, ‘मला हे काम जमणार नाही’ यासारखे नकारात्मक विचार प्रथम बंद करायला हवेत. लहान बीपासूनच वृक्ष तयार हाेताे हे लक्षात ठेवा.आपण जसा विचार करू तसे आपण हाेत असल्याने नकारात्मक विचार लहान वाटत असले, तरी त्याचा केव्हा वृक्ष हाेईल हे समजणार नाही. त्यासाठीच सकारात्मक विचार करायला हवेत. म्हणजे, ‘सगळे कसे व्यवस्थित सुरू आहे’ किंवा ‘मी वेळेत माझ्या कामावर पाेहाेचेन’ असे सतत म्हणायला हवे.
एकदा तुम्ही असे चांगले विचार करायला लागल्यावर नकारात्मक विचारांना जागा उरणार नाही. दृष्टिकाेन बदला, स्थिती बदलेल : एका व्यक्तीला तिच्या व्यवसायाचा जम बसविण्यात अडचणी येत हाेत्या. छाेट्या समस्यांचाही बाऊ करण्यामुळे हे घडत हाेते. आपण पराभूताच्या दृष्टिकाेनातून व्यवसाय करत असल्याचे त्याला कळत हाेते.वास्तवात, त्याला वाटत हाेत्या तेवढ्या त्याच्या अडचणी गंभीर नव्हत्या, पण त्याच्या निराशावादी दृष्टिकाेनामुळे हे घडत हाेते. नंतर त्याने दृष्टिकाेन बदलला आणि त्याच्या समस्या दूर व्हायला लागून त्याचा व्यवसाय चांगला सुरू झाला. काेणत्या समस्येकडे आपण कसे पाहताे यावर तिची तीव्रता ठरते आणि त्यातून मार्ग काढणे समजते.