सामान्यपणे असा समज आहे की, मानवी शरीराचे तापमान 98.6 अंश फॅरनहाइट (37 अंश सेल्सिअस) असते. पण, हे खरे नाही.
जर्नल ऑफ जनरल इंटर्नल मेडिसिनमध्ये प्रकाशित ताज्या संशाेधनानुसार आपले सामान्य तापमान 97 ते 97.7 अंश फॅरनहाइट असते.बाेस्टन चिल्ड्रेन्स हाॅस्पिटलचे रुमेटाेलाॅजिस्ट व एमडी जाेनाथन एस हाउसमॅन यांनी 329 तरुणांच्या बाॅडी टेंपरेचरवर संशाेधन केले. त्यांना सर्वांचे तापमान 97.7 अंश फॅरनहाइट असल्याचे आढळून आले. ताप 99 अंशापासून सुरू हाेताे. हे पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये आणि प्राैढाच्या तुलनेत मुलांमध्ये थाेडे जास्त, पण सकाळी कमी हाेते. त्यांनी सल्ला दिला की, तापमान फ्ले्नझीबल काॅन्सेप्ट असायला हवे, जे रुग्णाच्या वजन, उंची, वय, लिंग व दिवसाच्या काळाच्या संदर्भात पाहिले जावे.
नव्या संशाेधनानुसार सामान्य तापमानाची साखळी 97 ते 99 अंश फॅरनहाइटपर्यंत असू शकते. आपण किती सक्रिय आहात यावर हे अवलंबून असते.1861 मध्ये पहिल्यांदा जर्मन डाॅ. कार्ल वंडरलिच यांनी ही संकल्पना कायम केली हाेती.त्यांनी 25 हजार रुग्णांच्या बगलेचे तापमान 1 लाखाहून जास्त वेळा घेतले हाेते.90 च्या दशकात मेरीलँड विवित प्रशिक्षक फिलिप मेकाॅकिआक(वैद्यक प्राेफेसर) यांनी याविषयी शंका उपस्थित केली. 1992 मध्ये मेरीलँड विविच्या संशाेधकांनी नव्या उपकरणांच्या संशाेधनाद्वारे सांगितले की, त्या काळात वंडरलिचद्वारे वापरलेले थर्मामीटर विश्वसनीय नव्हते. जुनी संकल्पना चुकीचे ठरवणारे ठाेस पुरावे असूनही हे कायम आहेत