पाेलिसांच्या घरांसाठी सर्वंकष आराखडा तयार करा

    29-Jul-2022
Total Views |
 
 
 

Police 
पाेलिस गृहनिर्माणासंदर्भातील बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रशासनास निर्देश पाेलिसांच्या घरांचा प्रश्न हा राज्य शासनाच्या सर्वाेच्च प्राधान्याचा विषय असून, पाेलिसांच्या घरांसाठी गृह, नगरविकास, गृहनिर्माण व सिडकाे या सर्व विभागांनी समन्वयाने सर्वंकष आराखडा तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.पाेलिस गृहनिर्माण संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक आयाेजिण्यात आली हाेती.
 
त्यावेळी ते बाेलत हाेते. मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, अपर मुख्य सचिव (गृह) आनंद लिमये, पाेलिस महासंचालक रजनीश सेठ, मुंबईचे पाेलिस आयुक्त विवेक फणसाळकर, बृहन्मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबालसिंह चहल, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचे (म्हाडा) उपाध्यक्ष अनिल डिग्गीकर, मुंबइ महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आयुक्त एस.व्ही.आर.
श्रीनिवास, सिडकाेचे व्यवस्थापकीय संचालक डाॅ. संजय मुखर्जी, प्रधान सचिव, (गृहनिर्माण) मिलिंद म्हैसकर, प्रधान सचिव (नगर विकास) साेनिया सेठी, झाेपडपट्ट पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लाेखंडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित हाेते.
 
पाेलिस गृहनिर्माणच्या माध्यमातून पाेलिस स्थानके आणि पाेलिसांच्या शासकीय निवासस्थानांची उत्कृष्ट आणि दर्जेदार निर्मिती करण्यात येत आहे. या कामांना गती देण्याची गरज आहे. यासाठी कालमर्यादा निश्चित करून प्रकल्प पूर्ण करण्यावर भर देण्यात यावा, अशा सूचना उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या. या इमारतीच्या निगराणीसाठी पाेलिस गृहनिर्माण मंडळाने स्वतंत्र विभाग तयार करावा, असे निर्देशही त्यांनी दिले.पाेलिस गृहनिर्माण कल्याण मंडळाच्या अपर महासंचालक अर्चना त्यागी यांनी मंडळामार्फत सुरु असलेल्या आणि प्रस्तावित प्रकल्पांबाबत सादरीकरण केले.