दाेघांनाही समान पद्धतीने वाढवले, तर त्यांची प्रगती जास्त चांगली हाेते
संध्यानंद. काॅम सध्याचा काळ स्त्री-पुरुष समानतेचा मानला जाताे. पूर्वी केवळ पुरुषांच्या मक्तेदारी असलेल्या क्षेत्रांत आता स्त्रिया कर्तृत्व गाजवायला लागल्या आहेत. जवळपास सर्वच क्षेत्रांत त्या पुरुषांच्या बराेबरीने जबाबदारी पार पाडत असल्याचे दिसते. हे चांगलेच आहे. घराबराेबरच बाहेरच्या जबाबदाऱ्याही समर्थपणाने पार पाडणे हे स्त्रियांचे वैशिष्ट्य असते. पण, तरीही मुलगा आणि मुलगी यांना वाढवताना काही प्रमाणात भेदभाव दिसताे.मुलाप्रमाणेच मुलीलासुद्धा शिक्षणापासून सर्व क्षेत्रांत समान संधी देणे ही आजची गरज आहे. यालाच आता लिंगसमान पालकत्व (जेंडर न्यूट्रल पॅरेंटिंग) म्हणतात. म्हणजे, दाेघांना समान पद्धतीने वाढविणे, त्यांना पुढे जाण्यासाठी समान संधी देणे. पण हे एकदम हाेणार नाही. आपली मानसिकता त्यासाठी बदलायला हवी. लहान मुलांना काही भेट द्यावयाची असेल, तर आपण काय देताे याचा विचार करा.
मुलगी असेल, तर तिला बाहुली किंवा किचन सेट आणि मुलाला खेळण्यातील कार अथवा मैदानी खेळांचे सामान. कारण, मुलगी घरात राहून बाहुलीबराेबर खेळणार आणि मुलगा बाहेर मैदानावर खेळणार हे आपण गृहितच धरलेले असते. तेच कपड्यांबाबत. मुलींना गुलाबी, तर मुलांना सहसा निळ्या रंगाचे कपडे दिले जातात. पण हे टाळायला हवे. मुलगा-मुलगी यांना समान पद्धतीने वाढविणे आणि त्यांना त्यांचे निर्णय घेण्यासाठी सक्षम करणे म्हणजेसुद्धा ‘जेंडर न्यूट्रल पॅरेंटिंग.’ हुशारीबराेबर नसताे संबंध : भारतीय महिला क्रिकेट संघाच्या कप्तान मिताली राज यांनी नुकतीच क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यांच्या हातांत क्रिकेटच्या बॅटऐवजी तवा-झाऱ्याच असता तर त्या स्वयंपाकघरातच राहिल्या असत्या आणि भारतीय संघाने एवढी चांगली कामगिरी केली असती का, याचा विचार करा.
नामवंत शेफ संजीव कपूर यांच्या हाती क्रिकेटची बॅट दिली असती, तर वेगवेगळ्या स्वादिष्ट पदार्थांची माहिती आपल्याला मिळाली असती का? हे सांगण्याचा उद्देश एवढाच, की मुलगा अथवा मुलगी असण्याचा हुशारीशी काही संबंध नसताे. लिंगानुसार काैशल्य अथवा हुशारी ठरत नसते. प्रत्येक मूल वेगळे असते आणि त्याच्या क्षमताही भिन्न असतात.आपण फक्त त्या ओळखून त्यांना संधी द्यावयास हवी. मुलींसमाेर त्यांच्या आवडीचे पर्याय असायला हवेत. ते दिलेत, तर अनेक मुली कल्पना चावलांसारख्या अंतराळवीर किंवा भावना कांत यांच्यासारख्या लढाऊ वैमानिक हाेऊ शकतील. असेच मुलांबाबत केले, तर अनेक मुलगे सत्य पाॅल अथवा राेहित खाेसलासारखे फॅशन डिझायनर किंवा विनीत भाटिया आणि अतुल काेचरसारखे नामवंत शेफ हाेऊ शकतील आणि अशी नावे अपवाद राहणार नाहीत.
व्यावहारिक नुकसान : मानसशास्त्रज्ञ आणि पालकत्वतज्ज्ञ डाॅ. नम्रता सिंह यांच्या सांगण्यानुसार, मुलांना लैंगिक आधारे वाढवताना हाेणाऱ्या भेदभावामुळे आर्थिक निर्णय घेण्यात स्त्रिया कमी पडत असल्याचे दिसून आले आहे.माेठे घर घेणे, नवीन माेटार घेणे किंवा स्वत:चा व्यवसाय सुरू करणे आदी निर्णयांचा त्यात समावेश असताे. या कमतरतेमुळे त्या पूर्णपणे स्वावलंबी हाेऊ शकत नाहीत. अशा काेणत्याही निर्णयांत त्यांना पुरुषांचा सल्ला घ्यावासा वाटताे. त्यातून त्यांच्यात आणखी कमतरतेची भावना तयार हाेऊन त्या असे निर्णय घेण्यास कचरू लागतात, असे डाॅ.नम्रता सिंह म्हणतात.त्याचे हे वाॅशिंग मशीन 80 सेकंदात कपडे स्वच्छ करू शकते. स्वच्छतेचा वेळ डाग आणि कपड्यांनुसार वाढू शकताे. जर जास्त कपडे असतील आणि ते जर जास्त घाण असतील, तर जास्त वेळ लागू शकताे.
हे वाॅशिंग मशीन आयएसपी स्टीम तंत्रज्ञानावर आधारित आहे, जे कमी फ्रिक्वेन्सी, रेडिओ फ्रिक्वेन्सीवर मायक्राेवेव्हच्या मदतीने जीवाणू मारते. विशेष गाेष्ट म्हणजे यामध्ये तुम्ही धातूचे घटक आणि झझए किट देखील स्वच्छ करू शकता, फक्त थाेडे पाणी आणि काही मिनिटे याला मशीनमध्ये ठेवावे लागेल.या मशीनमुळे कपड्यांवरील डाग, धूळ आणि रंग सहज साफ करता येताे. यासाठी काेरड्या स्टीम जनरेटरचा वापर केला जाताे. 5 कपडे धुण्यासाठी 80 सेकंद लागतात. यामध्ये फक्त अर्धा कप पाणी वापरले जाईल. ही क्षमता 7-8घॠ माॅडेलची आहे.80घॠ माॅडेलमध्ये 50 कपडे स्वच्छ करण्याची क्षमता आहे, ज्यासाठी फक्त 5 ते 6 ग्लास पाणी लागेल. हे मशीन अजून बाजारात आलेले नाही.ते पायलट प्राेजेक्टवर आहे. हे आता चंदीगड, पंचकुला आणि माेहाली येथील काही रुग्णालयांमध्ये बसवण्यात आले आहे.