नेमबाजी स्पर्धेत विजयाच्या हॅट्ट्रिकचे ध्येय ठेवून काम करा : राज्यपाल काेश्यारी

21 Jul 2022 12:32:37
 
 
 

NCC 
 
एनसीसी आंतरराज्यीय नेमबाजी क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र एनसीसी संचालनालयाला सलग दुसऱ्या वर्षी प्रथम क्रमांकासह विजेतेपद मिळवून देणाऱ्या महाराष्ट्र एनसीसीच्या छात्रांना राज्यपाल भगतसिंह काेश्यारी यांनी राजभवनात बाेलावून काैतुकाची थाप दिली. महाराष्ट्र एनसीसी चमूने आता विजयाची हॅट्ट्रिक करण्याचे ध्येय समाेर ठेवावे. तसेच, पुढील वर्षी अधिकाधिक सुवर्ण पदके जिंकावीत, अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली.
 
राज्यपालांच्या हस्ते या वेळी सर्व छात्रांना छत्रपती शिवाजी महाराजांची मुद्रा व डाॅ. एपीजे अब्दुल कलाम यांचे अग्निपंख हे पुस्तक भेट देण्यात आले. चंडीगड येथे झालेल्या या स्पर्धेत महाराष्ट्र एनसीसी चमूने 6 सुवर्ण, 5 राैप्य व 1 कांस्य पदक प्राप्त केले. यावेळी एनसीसी महाराष्ट्र संचालनालयाचे अतिरिक्त महानिदेशक मेजर जनरल वाय.पी. खंडुरी, कमांडाेर सतपाल सिंह, ब्रिगेडिअर सी. मधवाल, नेमबाजी चमूचे प्रभारी अधिकारी कर्नल सतीश शिंदे, तसेच नेमबाजी स्पर्धेतील सहभागी स्पर्धक उपस्थित हाेते. महाराष्ट्र एनसीसीच्या नेमबाजी क्रीडा चमूत 8 मुले व 9 मुली, असा 17 छात्रांचा समावेश हाेता.
Powered By Sangraha 9.0