मानसिक तणावांपासून मानसिक तणावांपासून शिक्षकांनी शिक्षकांनी दूर राहणे आवश्यक

    27-Jun-2022
Total Views |
 
 
 
संध्यानंद.काॅम
 

teacher 
 
तंत्रज्ञानाचा माेठा फायदा म्हणजाे काेराेना काळात संसर्ग शिगेला पाेहाेचलेला असतानाही शिक्षण चालू राहणे. ऑनलाइन तंत्रज्ञानामुळे ते श्नय झाले.आता संसर्ग कमी हाेऊन शैक्षणिक संस्था पुन्हा सुरू झाल्या आहेत.काेराेना काळात विद्यार्थ्यांबराेबर शिक्षकांचीसुद्धा कसाेटी लागली हाेती.ऑनलाइन शिक्षणाचे तंत्रज्ञान आपल्यासाठी नवीन असल्यामुळे आधी शिक्षकांना ते शिकावे लागले आणि मग मुलांना शिकवावे लागले.नेहमीच्या वर्गाप्रमाणेच शिकवायचे असल्यामुळे सगळी तयारी करावी लागली. तंत्रज्ञान नवीन असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचा व्हिडिओऑडिओमध्ये गाेंधळ हाेत हाेता आणि त्यातून मार्ग काढावा लागला.विषय शिकविण्याबराेबरच मुलांचा ऑनलाइन अभ्यास घेणे, त्यांच्या चुका सुधारून मार्गदर्शन करणे आणि संपर्कात राहणे अशी कामेसुद्धा शिक्षकांना करावी लागली.
 
या सगळ्यांचा त्यांच्यावर खूप ताण पडला.सुदैवाने आता संसर्ग संपत चालल्यामुळे हा ताण कमी हाेण्याची श्नयता आहे. आता शिक्षकांनी त्यांच्या मानसिक आराेग्याची काळजी घेण्याची गरज आहे.तणाव : शिक्षकी पेशात मुळातच तणाव असताे. राेज एवढ्या मुलांना शिकविणे हाही ताण असताे आणि त्यात काही पालकांच्या असहकाय करण्याच्या वृत्तीची भर पडते. शैक्षणिक जबाबदाऱ्या आणि काैटुंबिक आयुष्याचा समताेल साधताना शिक्षकांना कसरत करावी लागते.आता त्यात संतुलन साधायला हवे.
अतिथकवा (बर्नआउट) : कामाच्या स्वरूपामुळे बहुसंख्य शिक्षकांना हा त्रास असताे. सतत सुरू असलेले काम आणि जबाबदाऱ्यांमुळे अतिथकव्याची (बर्नआउट) स्थिती येते. कामाची दखल व्यवस्थापन घेत नसेल, तर हा ताण आणखी वाढताे. त्यावर वेळेत उपाययाेजना करणे गरजेचे असते.
 
प्रेरणेचा अभाव : आपल्या कामाबाबत कमी असलेली प्रेरणा आणि आत्मसन्मानाचा अभाव यातून हे घडते. अनेक शिक्षकांच्या चांगल्या कामाचे याेग्य मूल्यमापन हाेत नाही आणि त्यांना पुरेसे वेतन मिळत नाही. काहींचे वेतनही अपुरे असल्याने असे हाेते.
चिंता : ऑनलाइन शिक्षणाच्या सवयीनंतर आता प्रत्यक्ष शाळेत जाण्याची अनेक विद्यार्थी आणि शिक्षकांनाही चिंता वाटते. गेली दाेन वर्षे एकाच पद्धतीने शिक्षण सुरू असणे हे त्याचे कारण. आता जुनी पद्धत पुन्हा सुरू असतानाच्या या संधिकालात चिंता वाटणे साहजिक आहे.न्यूनगंड : हा अनेक कारणांनी येऊ शकताे. आपला सहकारी आपल्यापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने शिकवित असणे, त्याचा पाेशाख आपल्यापेक्षा चांगला असणे, अशी काही कारणे त्यामागे असतात. यावर मात करायला हवी.
 
स्वसन्मान : शिकविण्याचे काम करण्यासाठी शिक्षकांना आधी याेग्य शिक्षण घ्यावे लागते, काैशल्य आत्मसात करावे लागते आणि मगच ताे त्याच्या क्षेत्रातील अधिकारी व्यक्ती हाेताे.पण, शिक्षकसुद्धा माणसेच असल्यामुळे त्यांच्याकडूनही चुका हाेऊ शकतात हे लक्षात ठेवायला हवे. त्यांच्या चुका त्यांच्याबराेबर व्यक्तिगत बाेलून दाखवायला हव्यात. विद्यार्थी, अन्य शिक्षक अथवा पालकांपुढे त्या जाहीर दाखविल्या, तर शिक्षकांच्या स्वसन्मानाला धक्का बसताे.कामाचा बाेजा : शिक्षण ऑनलाइन असाे वा ऑफलाइन; शिक्षकांवर कामाचा बाेजा असताेच.त्यात शिकविण्याच्या विषयाची तयारी करणे, मुलांचे गृहपाठ तपासण्यापासून अनेक कामांचा समावेश असताे.शिवाय ही सगळी कामे एका निश्चित वेळत पूर्ण करावयाची असतात. या सगळ्यांत त्यांच्यावरील तणाव वाढताे. शाळेत प्रत्यक्ष जाऊन शिकविण्याबाबत शिक्षकांमध्ये संमिश्र मते आहेत. काहींना पुन्हा थेट शिकविण्याची उत्सुकता आहे, तर काहींना ऑनलाइन पद्धतच बरी वाटते. पालक-शिक्षक यांच्या भूमिकांतही बदल झाल्याचे दिसतात. पूर्वी अभ्यासात मागे पडणाऱ्या विद्यार्थ्याबाबत शिक्षक त्याच्या पालकांकडे तक्रार करत असत आणि आता पालकच याबाबत प्रश्न करतात.
 
प्रत्येक मूल वेगळे असते आणि त्याची शिकण्याची क्षमताही वेगळी असते हे येथे लक्षात ठेवायला हवे. त्याच्या प्रगतीबाबत केवळ शिक्षकांना जाब विचारण्यापेक्षा पालकांनीसुद्धा मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष द्यावयास हवे. कारण, मुलांची शैक्षणिक प्रगती केवळ शाळेवर अवलंबून नसते. शिक्षकांना अतिथकव्याचा त्रास हाेत असल्याचा परिणाम मुलांच्या अभ्यासावर हाेऊन नकारात्मक वातावरणात ती कंटाळायला लागतात. मुलांना शिकविण्याचा आनंद वेगळाच असल्याने शिक्षकही या थकव्याकडे दुर्लक्ष करतात. पण, तसे करणे अयाेग्य आहे. शिक्षकांचे मानसिक आराेग्य चांगले असेल, तर ते उत्साहाने शिकवतील आणि मुले आनंदाने शिकतील.नवी पिढी सुसंस्कारित करण्याचे माेलाचे काम शिक्षक करत असल्यामुळे त्यांच्या आराेग्याबाबत सर्वांनी जागरूक असणे महत्त्वाचे आहे. सततचे तणाव आणि लाेकांच्या अपेक्षांमुळे शिक्षकांनी आधी त्यांचे मानसिक आराेग्य सांभाळायला हव