वाचनाने बुद्धी, मनाला बैठक मिळते

    27-Jun-2022
Total Views |
 
 
 
 
reading
थाेडक्यात, वाचन हा ज्ञान मिळवण्याचा एक उत्तम मार्ग आहे. वाचन ही एक साधना आहे, ज्यातून बुद्धी आणि मन यांना एक बैठक मिळते. ध्यान, नामस्मरण, मेडिटेशन या गाेष्टी लक्ष एकाग्र करण्यासाठी जित्नया उपयुक्त आहेत तितकेच वाचन देखील उपयुक्त आहे. डाेळ्यांना, मेंदूला ताण देणाऱ्या माेबाइल, साेशल मीडियापेक्षा वाचनाची करमणूक केव्हाही चांगली.सतत माेबाइल घेऊन काहीतरी पाहत बसण्यापेक्षा वाचनाची सवय कितीतरी पटीने चांगली आणि लाभदायक आहे.तंत्रज्ञान वेगाने बदलते आहे तशी वाचनाची साधने बदलत आहेत. आता तुम्ही इ-बुक्स, इ-मॅगझिन, ई-वृत्तपत्र असे सर्व साहित्य तुमच्या माेबाइल किंवा संगणकावर वाचू शकता. ते मिळवण्यासाठी ग्रंथालय, दुकान कशाचाही शाेध घेण्याची गरज नाही.
 
तुमच्या बाेटाच्या टाेकावर सर्वकाही मिळू शकते. तुम्हाला जर वाचनाच्या पारंपरिक पद्धतीला चिकटून राहायचे असेल, तर थेट पुस्तके, वृत्तपत्र आणून भाैतिकमाध्यमाने तुम्ही वाचू शकता. याशिवाय किंडल नावाचे तंत्रज्ञान सध्या प्रचलित आहे. ज्यावर तुम्हाला हवे ते पुस्तक, वर्तमानपत्र तुम्ही माेबाइलप्रमाणे पण अधिक साेयीस्करपणे वाचू शकता.त्यामुळे तुमच्या डाेळ्यावर ताणही येत नाही.
वाचनामुळे आपली स्मरणशक्ती सुधारण्यास मदत हाेते. याशिवाय आपण अनेक नवीन शब्ददेखील शिकताे, जे आपले शब्दसंग्रह आणि आपले संवादकाैशल्य सुधारतात. जेव्हा आपण काही वाचताे तेव्हा आपण त्यात रमून जाताे, आपण आपला भूतकाळ विसरताे आणि वर्तमानात जगताे. पुस्तके वाचून आपण आपल्या वाईट आठवणी विसरताे, त्यामुळे आपला ताण कमी हाेण्यास मदत हाेते.