हिंजवडी मेट्राेसाठी खास अग्निसुरक्षा प्रशिक्षणाचे आयाेजन

    27-Jun-2022
Total Views |
 
 

metro 
 
पिंपरीच्या अग्निग्नशमन दलाचा पुढाकार : मेट्राे मार्गिकेच्या कामकाजाचा घेतला आढावा हिंजवडी ते शिवाजीनगर या 23 किमी.च्या मार्गावर सुरू असलेल्या मेट्राे मार्गिकेच्या कामकाजाचा सुरक्षा आढावा घेण्यात आला. या वेळी पिंपरी-चिंचवड अग्निशमन दलाच्या सहयाेगाने खास ‘अग्निसुरक्षा प्रशिक्षणा’चे आयाेजन करण्यात आले हाेते. हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गावरील मेट्राे मार्गिकेचे काम पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (पीएमआरडीए) सार्वजनिक खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर टाटासमूहाने हाती घेतले असून, त्याच्या कार्यान्वनासाठी पुणे आयटी सिटी मेट्राे रेल लिमिटेड या विशेष वहन (स्पेशल पर्पज व्हेईकल एसपीव्ही) कंपनीची स्थापना करण्यात आली आहे.
 
हिंजवडी माहिती तंत्रज्ञान केंद्र आणि शिवाजीनगर मध्यवर्ती केंद्राला जाेडणारी ही मेट्राे मार्गिका महत्त्वाची असल्याने या मार्गिकेवरील सुरक्षाविषयक तरतुदी आणि आपत्कालीन नियाेजनाचा आढावा घेण्यासाठी ताथवडे कास्टिंग यार्डमध्ये हे अग्निसुरक्षा प्रशिक्षण आयाेजिण्यात आले हाेते. मेट्राेचे काम सुरू असताना काेणकाेणत्या संभाव्य कारणांमुळे आग लागण्याचा धाेका असू शकताे, आगीच्या कारणानुसार ती विझवण्याचे विभिन्न मार्ग काेणते, आणीबाणीच्या प्रसंगी अग्निशमन दलाची प्रत्यक्ष मदत पाेहाेचेपर्यंत कंपनीचे कर्मचारी कशा प्रकारची उपाययाेजना करू शकतात, आदी विविध बाबींचे प्रशिक्षण या वेळी देण्यात आले.पुणे आयटी सिटी मेट्राे कंपनीचे वाहतूक नियमन अधिकारी, सुरक्षा अधिकारी, समन्वय अधिकाऱ्यांच्या जाेडीने पिंपरी-चिंचवड अग्निशमन दलाचे अधिकारी, कर्मचारी आणि वाहतूक पाेलिस या वेळी उपस्थित हाेते.