भारतातील लाेकप्रिय वेडिंग डेस्टिनेशन : उदयपूर

    27-Jun-2022
Total Views |
 
 

Udaipur 
 
सेलिब्रिटी लाेकांच्या धडाकेबाज विवाह साेहळ्याचे साक्षीदार असलेले राजस्थानचे उदयपूर शहर आता जागतिक पातळीवरील उल्लेखनीय विवाह साेहळ्याच्या यादीत समाविष्ट करण्यात आल्यामुळे जागतिक पातळीवर उदयपूर शहराचा गाैरव वाढला आहे.
इंटरनॅशनल वेडिंग प्लॅनिंग कंपनी ‘द नाॅट’ने युनिक वेडिंग डेस्टिनेशनची ज्या 11 देशांची यादी तयार केली आहे, त्यात भारताव्यतिर्नित ऑस्ट्रेलिया, दुबई, फिजी, फ्रान्सची लाॅयर व्हॅली, माराकेस (माेराे्नकाे), न्यूझीलँड, सॅन मॅगुएल डे, अलेंदे (मे्निसकाे) दक्षिण आफ्रिका, ताहिती, थायलंडचा समावेश आहे. या यादीत भारताच्या फ्नत उदयपूर शहराचा समावेश आहे.
 
उदयपूर जगात लेक सिटी (तलावांचे शहर) म्हणून ओळखले जाते. उदयपूर येथील विवाह साेहळा अप्रतिम, अद्भुत असताेच; पण त्यात संस्कृतीही जपली जाते. उदयपूरची शानदार स्थापत्यकला, शानदार महाल, राजवाडे, ताज लेक पॅलेस, फाईव्ह स्टार हाॅटेल्स आणि अरवली पर्वताचा रम्य परिसर नवविवाहित जाेडप्यांना अद्भुत राेमॅन्टिक अनुभूती देताे. उदयपूरचा जागतिक यादीत समावेश झाल्यामुळे राजस्थान पर्यटन महामंडळ आनंदित झाले आहे.कारण हे वर्ल्ड वाईड प्रमाेशन लवकरच उदयपूरच्या सीझनकाळात डेस्टिनेशन वेडिंग आणखी व्यापक हाेऊन त्याचा पर्यटन क्षेत्राला लाभ मिळेल. ‘द नाॅट इंक’, अमेरिकन मीडिया आणि आयटी कंपनी आहे. ही कंपनी ज्यांचा विवाह लवकरच हाेणार आहे, अशा जाेडप्यांना मटेरियल, प्राॅड्नट आणि सर्व्हिस देते. 1996 मध्ये ही कंपनी न्यूयाॅर्कमध्ये सुरू झाली.