साेने आकाशातून आलंय की भूगर्भातून?

    27-Jun-2022
Total Views |
 
 

Gold 
 
जगातील स्त्री असाे की पुरुष सर्वांनाच आपल्या घरात साेने असावे असे वाटते.स्त्रिया साेने साैंदर्य वृद्धिंगत करण्यासाठी दागिन्यांच्या स्वरूपात वापरतात तर पुरुष अडीअडचणीच्या वेळी कामी येणारा धातू म्हणून गुंतवणुकीच्या स्वरूपात वापरतात.पण हे इतके माैल्यवान साेने आकाशातून येते की पृथ्वीच्या भूगर्भातून? याचा कधी विचार केला आहे का? साेने खाणीत सापडते असेकाेणीही उत्तर देईल.राजा असाे की रंक, श्रीमंत असाे, की गरीब, लाेकांना साेने आवडते.पण साेन्यापेक्षा माैल्यवान प्लॅटिनम हा धातू असून देखील लाेकांना साेनेच का आवडते, हे सांगणे कठीण आहे. पाैराणिक काळात देवीदेवता देखील साेने वापरत. देवीदेवतांच्या साेन्याच्या मूर्ती असत. भूगर्भ शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार साेने सर्वप्रथम उत्तर अमेरिका खंडात सापडले.
 
त्यानंतर 1801 मध्ये उत्तर कॅराेलिना, 1829 मध्ये जाॅर्जिया, 1848 मध्ये कॅलिफाेर्निया, 1891 मध्ये काेलाेरॅडाे, 1893 मध्ये अलास्का, 1851 मध्ये ऑस्ट्रेलिया आणि 1886 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या खाणीत साेने सापडले. यानंतर 1931 मध्ये रशिया आणि कॅनडामध्ये माेठी साेन्याची खाण सापडली. यानंतर आलास्का, भारत, ब्राझील, मे्निसकाे, काेलंबिया, रूमानिया, टास्मानिया आणि भारतातही साेन्याच्या खाणी आढळल्या आहेत. 2020 मध्ये जगात साेन्याचा उत्पादक सर्वांत माेठा देश चीन हाेता. यानंतर रशियावऑस्ट्रेलियाचा क्रमांक येताे. ब्रिस्टाॅल विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, पृथ्वीच्या सपाटींवर चार मीटर जाड साेन्याची पातळी असलेल्या साेन्याचा भूगर्भात साठा आहे.दुसऱ्या बाजूला स्पेनमधील युनिव्हर्सिटी ऑफ ग्रॅनेडाच्या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे, की साेने फ्नत पृथ्वीवरच सापडते. पृथ्वीचा भूगर्भ तीन पातळीवर विभागलेला आहे. ते आहेत पाेपडा, आवरण आणि काेअर असे हे तीन प्रकार आहेत.