वार्धक्य लांब ठेवण्यासाठी साैदी अरेबिया संशाेधन करणार

    27-Jun-2022
Total Views |
 
 
संध्यानंद.काॅम
 

Age 
 
आपल्या देशातील नागरिकांच्या वार्धक्याचे प्रमाण वेगाने वाढत आहे, अशी भीती व्यक्त करून वार्धक्याचा वेग कमी व्हावा, यासाठी उपचार शाेधून काढण्यासाठी साैदी अरेबियाने सुमारे सात अब्ज 50 काेटी रुपयांची तरतूद केली आहे.तारुण्याचे वरदान मिळाल्याच्या कथा आपण पुराणात वाचताे; पण प्रत्यक्षात तारुण्यानंतर वार्धक्य येतेच. वृद्ध हाेण्याची काेणाचीही इच्छा नसली, तरी आयुष्यातील हे टप्पे काेणालाही चुकत नाहीत. कायम तरुण राहावे, असे औषध आजवर तरी सापडलेले नाही. काम नव्हे, तर निदान जास्तीत जास्त काळ तारुण्य राहावे, यासाठी साैदी अरेबिया औषधाच्या शाेधात आहे आणि त्यासाठी या देशाने तब्बल सात अब्ज 50 काेटी रुपयांची तरतूद केली आहे.साैदीच्या राजघराण्याने ‘हिवाेल्यूशन फाैंडेशन’ नावाच्या एक ना नफा तत्त्वावर आधारित एका कंपनीची स्थापना केली आहे. या कंपनीकडून संशाेधनासाठी तरतूद करण्यात आली आहे.
 
वार्धक्याचे जीवशास्त्र आणि लाेकांना जास्तीत जास्त वर्षे निराेगी जीवन जगण्यासाठी मार्ग शाेधणे, या विषयावर हे संशाेधन सुरू करण्यात आले आहे. ‘हेल्थ स्पॅन’ असे या संकल्पनेचे नाव आहे. या फाैंडेशनकडून औपचारिकरीत्या तशी घाेषणा करण्यात आलेली नाही. मात्र वार्धक्याचे कारण काय आणि औषधांचा वापर करून वार्धक्याची गती कमी करता येऊ शकते का, हे जाणून घेण्यासाठी हे संशाेधन हाेणार आहे.शरीर वृद्ध हाेण्याच्या प्रक्रियेची गती कमी केली, तर विविध प्रकारचे आजार हाेण्याची गतीही कमी हाेईल आणि लाेकांना आराेग्यपूर्ण जीवन अधिक काळ उपभाेगता येईल, असे वार्धक्याचे कारण काय, या विषयावरील संशाेधनासाठी निधीची तरतूद करण्यात आल्याची माहिती मेयाे क्लिनिकचे माजी अधिकारी मेहमूद खान यांनी दिली.संशाेधनाअंतर्गत मेटामाॅर्फिन या मधुमेहावर वापरण्यात येणाऱ्या औषधाच्या चाचण्या काही हजार ज्येष्ठ नागरिकांवर करण्यात येणार आहेत. या संशाेधनामध्ये प्रगती हाेत असल्याचे दिसून आले, तर आणखीही तरतूद मंजूर हाेण्याची शक्यता आहे.