प्रत्येकाने वैयक्तिक व व्यक्तिगत विकासावर भर द्यावा : ॲड. संजय चितळे

येरवडा कारागृहात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत मनःशांती व व्यक्तिमत्त्व विकास शिबिर

    26-Jun-2022
Total Views |

sanjay
 
येरवडा, 25 जून (आ.प्र.) :
 
प्रत्येक व्यक्तीने वैयक्तिक आणि व्यक्तिगत विकासावर भर देणे आवश्‍यक असून, यासाठी भगवद्‌‍ गीतेतील मौलिक ज्ञान आत्मसेत करावे, असे प्रतिपादन मनःशांती व व्यक्तिमत्त्व विकास तज्ज्ञ ॲड. संजय चितळे यांनी केले. येरवडा मध्यवर्ती कारागृहात बंदिजनांकरिता आयोजित करण्यात आलेल्या मनःशांती व व्यक्तिमत्त्व विकास शिबिरात ते बोलत होते. सदर कार्यक्रम पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत आयोजित करण्यात आला होता.
या प्रसंगी विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव श्रीमती मंगल दीपक कश्‍यप, येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे उपाधीक्षक मंगेश जगताप, निवृत्त न्यायाधीश श्रीमती अंजली आपटे उपस्थित होत्या. या वेळी मार्गदर्शन करताना ॲड. चितळे यांनी भगवद्‌‍ गीतेतील कर्मयोग संमर्पक उदाहरणासह स्पस्ट करीत कर्मयोगाची चतु:श्रुती आत्मसात करणायचे महत्त्व विशद केले. आपल्या वैयक्तिक विकासासाठी आणि मनः शांतीसाठी भगवद्‌‍ गीतेतील मौलिक ज्ञान मिळविणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी बोलताना श्रीमती मंगल कश्‍यप यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अधिनियमांची माहिती दिली. तसेच, कारागृहातील सर्वांनी मनः शांती आणि व्यक्तिमत्त्व विकासाबाबत करण्यात आलेले मार्गदर्शन आत्मसात करावे, असा सल्ला त्यांनी दिला. शिबिरात 75 बंदिजन उपस्थितीत होते. तसेच कारागृह भेट प्रकल्प विधिज्ञ, कर्मचारीही उपस्थिती होते. कार्यक्रमास कारागृह अधीक्षधक श्रीमती राणी भोसले यांनी विशेष सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार रेवणनाथ कानडे यांनी मानले.