शस्त्रक्रियेसाठी रुग्णाचे वय नव्हे, वैद्यकीय तंदुरुस्ती जास्त महत्त्वाची असते

साईश्री हॉस्पिटलचे एमडी व चीफ रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन व स्पोर्ट्‌स इंज्युरी स्पेशालिस्ट डॉ. नीरज आडकर यांची माहिती

    26-Jun-2022
Total Views |
 
AADKAR
 
डॉ. नीरज आडकर
चीफ रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन
आणि स्पोर्ट्‌स इंज्युरी स्पेशालिस्ट
डीपी रोड, औंध, पुणे 411007
फोन: 020-67448600/25888600
मोबा:  9689930608/12
web : www.saishreehospital.org
 
 
 
 
वाढत्या वयानुसार आजार होऊ लागतात. त्यात सांधे आणि स्नायूंच्या विकारांचे प्रमाण जास्त असते आणि काही वेळा शस्त्रक्रियासुद्धा करावी लागते. पण वय जास्त असेल, तर अशी शस्त्रक्रिया करावी की नाही असा प्रश्‍न पडतो. सध्याच्या प्रगत वैद्यकीय पद्धतीमुळे शस्त्रक्रिया सुलभ झाल्या आहेत आणि रुग्ण लवकर बरा होऊ शकतो. या संदर्भात काहींनी विचारलेल्या प्रश्‍नांना पुण्यातील साईश्री हॉस्पिटलचे संचालक आणि स्पोर्ट्स इंज्युरीतज्ज्ञ डॉ. नीरज आडकर यांनी सविस्तर उत्तरे देऊन शंकासमाधान केले आहे.
 
 
सर, माझे वय 82 वर्षे असून, मला पूर्ण गुडघाबदलाच्या शस्त्रक्रियेचा सल्ला देण्यात आला आहे. माझ्या वयाच्या रुग्णांसाठी तसेच त्याला अन्य काही आजार असतील, तर ही शस्त्रक्रिया कितपत उपयुक्त ठरेल? मला मधुमेह असला तरी तो नियंत्रणात आहे...
 
उत्तर : तुम्ही वैद्यकीयदृष्ट्या तंदुरुस्त असलात, तर या वयातसुद्धा तुम्हाला ही शस्त्रक्रिया करून घेता येईल. तुमचे फिजिशिअन आणि हृदयरोगतज्ज्ञ (cardiologist) तुमच्या शारीरिक तंदुरुस्तीबाबत निर्णय घेतील आणि नंतरच शस्त्रक्रियेबाबत ठरविले जाईल. आमच्या साईश्री हॉस्पिटलमध्ये आम्ही तुमच्या वयाच्या अनेक रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया केल्या आहेत. ‘रिजनल ॲनेस्थेशिया` (regional anesthesia) देऊन ही शस्त्रक्रिया केली जाते आणि तुमच्या वयाच्या रुग्णांसाठी ती सुरक्षित असते. रुग्णाचे वय नव्हे, वैद्यकीय तंदुरुस्ती जास्त महत्त्वाची असते हे मी पुन्हा स्पष्ट करतो. तुम्ही निरोगी असाल, तर ही शस्त्रक्रिया करून घेता येईल.
 
 
डॉक्टर, रोबोटिक टीकेआरमुळे  लवकर बरे होता येत असल्याचे मी ऐकले आहे. मलाही ‘रिप्लेसमेंट सर्जरी`चा सल्ला देण्यात आला आहे. या ‘टीकेआर`नंतर मी टेनिस, गोल्फ, पोहणे आणि सायकलिंगसारख्या माझ्या आवडी पुन्हा सुरू करू शकेन का?
 
उत्तर : रोबोटिक शस्त्रक्रियेमुळे रिकव्हरी वेगाने होते आणि शस्त्रक्रियेनंतर हालचालीसुद्धा लवकर सुरू करता येतात. यामुळे गुडघ्यांचा तोल योग्य प्रकारे सावरला जातो. जॉइंट रिप्लेसमेंट सर्जरीनंतर (Joint Replacement surgery) टेनिस, गोल्फिंग, पोहणे किंवा सायकल चालविणे सुरक्षित असते. मात्र, तत्पूर्वी फिजिओथेरपीचा बेसिक कोर्स घ्यावा लागतो आणि हे छंद सुरू करण्यासाठी तुमच्या डॉक्टरांनी परवानगी देणे आवश्‍यक असते.
 
जॉइंट रिप्लेसमेंट सर्जरीच्या रोबोटिक आणि नॉन-रोबोटिक पद्धतींत काय फरक असतो?
 
उत्तर : शस्त्रक्रिया करताना रोबोटिक सिस्टिम शल्यविशारदाला मदत करत असल्यामुळे सांध्यांचा तोल योग्य प्रकारे साधण्यास मदत होते. रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंटचा आणखी एक फायदा म्हणजे, हाडांवर छेद (cuts) घेण्यापूर्वी अथवा कोणतेही महत्त्वाचे निर्णय करण्यापूर्वी त्याचे परिणाम (repercussion) काय होतील याची माहिती शल्यविशारदाला मिळते. त्यामुळे छेद घेण्यापूर्वी सांध्यांच्या समतोलावर काय परिणाम होतील हे समजते. गुडघे बदलाच्या पारंपरिक अथवा नॉनरोबोटिक सर्जरीमध्ये एवढे अचूक काम करता येत नाही. रोबोटिक तंत्रज्ञानामुळे नितंब- गुडघे-घोटे यांचा अक्ष योग्य प्रकारे साधला जातो. सांध्यांच्या समतोलासाठी तो महत्त्वाचा ठरतो आणि त्यामुळे इम्प्लां टचे आयुष्य वाढते. जॉइंट रिप्लेसमेंट सर्जरी जास्त अचूक आणि योग्य असल्याचे अनेक शास्त्रीय प्रबंधांतही स्पष्ट करण्यात आले आहे.
 
डॉक्टर, रोबोटिक नी रिप्लेसमेंटमध्ये  कोणता इप्लांट वापरावा याबाबत काय सांगाल? या शस्त्रक्रियेसाठी काही विशेष इम्प्लांट असतात का?
 
उत्तर : बहुसंख्य जॉइंट रिप्लेसमेंट इम्प्लांट्स रोबोटिक सिस्टिमबरोबर सुसंगत (compatible) असतात आणि त्यातील बहुतेक कोबाल्ट क्रोम मटेरियलपासून तयार केले जातात. विशिष्ट थर दिलेले काही इम्प्लांट्स असतात आणि त्यामुळे त्यांची फूट-तूट टळून या कृत्रिम अवयवांचे (prosthesis) आयुष्य वाढते. ऑस्टिओपोरोसिस (osteoporosis) (रुग्णाच्या हाडांमधील ताकद), व्यंग (deformity) आणि रुग्णाचे वय (त्या व्यक्तीला धातूची ॲलर्जी आहे का) हे काही मापदंड असून, संबंधित रुग्णावर अशी शस्त्रक्रिया करण्यापूर्वी त्याचा विचार केला जातो.
 
मी गुडघ्यांवरील शस्त्रक्रिया करून घेणे टाळले तर त्याचे काय परिणाम होतील?  मला जॉइंट रिप्लेसेंट सर्जरीचा सल्ला दोन वर्षांपूर्वी देण्यात आला होता, पण मला अंथरूणाला खिळून राहण्याची भीती वाटते...
 
उत्तर : तुमच्या डॉक्टरांनी तुम्हाला गुडघे बदलाच्या शस्त्रक्रियेचा सल्ला दिला आहे म्हणजे तुमच्या सांध्यांमध्ये तीव्र स्वरूपाचा ऑस्टिओआर्थ्रायटिस असावा. कुर्चेची (cartilage) फूट-तूट यात होते. रक्तपुरवठा होत नसलेला हा शरीरातील एकमेव भाग असून, एकदा त्याचे नुकसान झाले तर ते कधी भरून येत नाही. जॉइंट रिप्लेसमेंटच्या शस्त्रक्रियेत आम्ही खराब झालेली कुर्चा बदलतो. याला रक्तपुरवठा होत नसल्यामुळे त्यावर औषधे देता येत नाही. तुम्हाला शस्त्रक्रियेचा सल्ला दिला गेला असेल, तर वेदनाशामके आणि तत्सम औषधे घेऊन ती लांबविण्यात अर्थ नाही. कारण, या औषधांचे साइड इफेक्ट्स असतात. सध्याच्या काळात गुडघे बदलाच्या शस्त्रक्रियेनंतर 24 तासांत हालचाली करता येतात आणि दुसऱ्या दिवशी रुग्ण चालू शकतो. काही केसेसमध्ये तर रुग्ण शस्त्रक्रिया झाल्याच्या दिवशीसुद्धा चालू शकतो. गुडघ्याच्या हालचाली लगेच सुरू करता येतात. तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी रुग्ण घरीसुद्धा जातो. त्यामुळे रुग्णाला अंथरूणावर पडून राहावे लागते या समजुतीला काही अर्थ नाही. तुम्हाला शस्त्रक्रियेचा सल्ला दिला असेल, तर तंदुरुस्ती चाचणी करून घ्या आणि वैद्यकीयदृष्ट्या तंदुरुस्त असाल, तर वेळेवर गुडघा बदलाची शस्त्रक्रिया करून घेणे योग्य ठरेल.
 
तुमच्या हॉस्पिटलमध्ये सर्वांत आधुनिक ॲक्टिव्ह रोबोटिक सिस्टिम असल्याचे मी ऐकले आहे. ॲक्टिव्ह रोबोट म्हणजे काय? सगळे रोबोट ॲक्टिव्ह आणि ॲटोमेटिक नसतात का?
 
उत्तर : हा प्रभावशाली प्रश्‍न आहे! रोबोटिक्सची विभागणी ॲक्टिव्ह रोबोट्स आणि नॉनॲ क्टिव्ह किंवा पॅसिव्ह रोबोट्स अशी केली जाते. जॉइंट रिप्लेसमेंट सिस्टिम्ससाठी ॲक्टिव्ह रोबोटिक सिस्टिम असलेले साईश्री हॉस्पिटल हे पश्‍चिम महाराष्ट्रातील पहिले केंद्र आहे. शस्त्रक्रियेपूर्वी येथे सीटी-स्कॅन केला जातो आणि लेग अलाइनमेंट तसेच डिफॉर्मिटीचा प्रत्यक्ष सर्जरीपूर्वी लॅपटॉपवर अंदाज घेतला जातो. इम्प्लांटची प्लेसमेंट, त्याचे रोटेशन आदींचे नियोजन करून रुग्णावर प्रत्यक्ष शस्त्रक्रिया करण्यापूर्वी आम्ही लॅपटॉपवर आभासी पद्धतीने पूर्ण शस्त्रक्रिया करतो. हे सगळे नियोजन रोबोटला फिड केले जाते. तो त्यात आणखी सुधारणा करतो. एकदा नियोजनाला अंतिम स्वरूप मिळाल्यावर रोबोट आठ ते दहा मिनिटांत शस्त्रक्रिया पूर्ण करतो. ॲक्टिव्ह रोबोटचे काम असे चालते. नॉन-ॲक्टिव्ह रोबोटपेक्षा हे रोबोट जास्त कार्यक्षम असल्यामुळे शस्त्रक्रियेचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचतो. या शस्त्रक्रियेमुळे रुग्णही समाधानी राहत असल्याचा एक शल्यविशारद म्हणून माझा अनुभव आहे.