वाराणसी विमानतळावर संस्कृतमधून उद्घाेषणा

25 Jun 2022 18:40:29

Varanasi
देशाच्या इतिहासात प्रथमच विमानतळावर संस्कृत भाषेत उद्घाेषणा करण्याची एअरपाेर्ट अ‍ॅथाॅरिटी ऑफ इंडियाने परवानगी दिली आहे. त्यानुसार संस्कृतमध्ये उद्घाेषणा करण्याचा मान उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील लालबहादूर शास्त्री विमानतळाला मिळाला आहे.साधारणपणे देशातील सर्वच विमानतळांवर हिंदी व इंग्रजी भाषेतच उद्घाेषणा (अनाऊंसमेंट) करण्यात येते.परंतु संस्कृत भाषेचे प्राचीन काळापासू असलेले महत्त्व पाहता एअरपाेर्ट अ‍ॅथाॅरिटी ऑफ इंडियाने प्रथमच वाराणसी विमानतळावर संस्कृत भाषेत उद्घाेषणा करण्याची परवानगी दिली आहे, अशी माहिती विमानतळ संचालक आर्यमा संन्याल यांनी दिली.
Powered By Sangraha 9.0