प्लुटाेच्या उपग्रहावरील लाल टाेपीचे रहस्य उलगडल्याचा शास्त्रज्ञांचा दावा

    25-Jun-2022
Total Views |
 
 
 

Pluto 
प्लुटाेचा चंद्र (उपग्रह) असलेल्या चेराॅनवरील ‘लाल टाेपी’चे (रेड कॅप) रहस्य उलगडण्यात यश आल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. आपल्या सूर्यमालेतील सर्वांत दूरच्या प्लुटाेचा ‘ग्रहा’चा दर्जा पूर्वीच काढून घेण्यात आला आहे.सूर्यमालेत पूर्वी प्लुटाेसह नऊ ग्रह माेजले जात हाेते. पण अत्यंत लहान आकारामुळे प्लुटाेचा ग्रहाचा दर्जा काही वर्षांपूर्वी रद्द केला जाऊन त्याला लहान वस्तू असे संबाेधले जाऊ लागले आहे.पृथ्वीपासून पाच अब्ज किलाेमीटरपेक्षा जास्त अंतरावर असलेला प्लुटाे अतिशीत असून, तेथे बर्फाचे साम्राज्य असल्याचा अंदाज आहे. चेराॅन हा त्याचा उपग्रह आहे. या उपग्रहावर असलेल्या ‘लाल टाेपी’चे शास्त्रज्ञांना कुतूहल हाेते. मात्र, पृथ्वीपासून असलेले प्रचंड अंतर आणि प्रकाशाच्या तीव्र परिवर्तनामुळे या प्लुटाेचेराॅनचे सुस्पष्ट फाेटाे मिळत नव्हते.
 
अमेरिकेच्या ‘नॅशनल एराेनाॅट्निस अँड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन’ (नासा) या संस्थेने अंतराळात साेडलेल्या ‘न्यू हाेरायझन्स’ या अवकाश यानांनी प्लुटाे-चेराॅनवरून उड्डाणे करून या दाेघांचे स्पष्ट फाेटाे काढले. त्यात चेराॅनच्या माथ्यावर ‘लाल टाेपी’ दिसल्यावर शास्त्रज्ञांचे कुतूहल जागृत झाले. पृथ्वीवर असा रंग आढळणे म्हणजे लाेह आणि गंजाचे अस्तित्व मानले जाते. पण प्लुटाे-चेराॅनसारख्या सूर्यापासून अतिदूर असलेल्या ग्रहांवर लाेह सापडणे श्नय नाही. चेराॅनवरील ‘थाेलिन्स’ या रसायनांमुळे ही ‘लाल टाेपी’ असल्याचा दावा ‘सायन्स अँड जिओफिजिकल रिसर्च लेटर्स’ या नियतकालिकात करण्यात आला आहे. या रसायनांतील संयुगे सूर्याकडून येणाऱ्या अतिनील किरणांतील काही रंग शाेषून घेत असल्यामुळे लाल रंग येताे आणि त्यामुळे चेराॅनच्या उत्तर ध्रुवावर ही ‘लाल टाेपी’ निर्माण झाली असावी, असा दावा या लेखात करण्यात आला आहे.