जगात दर दहापैकी एक मूल हाेत आहे बालमजूर

    25-Jun-2022
Total Views |
 
 
संध्यानंद.काॅम
 

Labour 
 
 
बालमजुरी विराेधात दर वर्षी पाळल्या जाणाऱ्या ‘जागतिक बाल श्रम निषेध दिवसा’ची यंदाची संकल्पना आहे ‘सामाजिक सुरक्षिततेतून बालमजुरीचा अंत.’ बालमजुरीची पद्धत संपवायची असेल, तर सामाजिक सुरक्षा अधिक भक्कम करायला हवी.
 
सहा काेटी मुलीही बालमजूर : ‘युनिसेफ’ या संस्थेने गेल्या वर्षीच्या (2021) जूनमध्ये जारी केलेल्या अहवालानुसार, बालमजुरांमध्ये मुलीसुद्धा आहेत.जागतिक पातळीवर 6.3 काेटी मुली आणि 9.7 काेटी मुलग्यांना बालमजुरी करावी लागते. 2016-2020 या काळात बालमजुरी करणाऱ्यांत 84 लाखांची वाढ झाल्याचे हा अहवाल म्हणताे.
 
दाेन दशकांत घटली संख्या : आंतरराष्ट्रीय श्रम संघटना आणि ‘युनिसेफ’ने जारी केलेल्या 2021 च्या अहवालानुसार, बालमजुरीचे प्रमाण कमी करण्यात गेल्या दाेन दशकांत बरेच यश लाभले आहे. 2000 ते 2020 या काळात बालमजुरीतील मुलांची संख्या 8.55 काेटींनी घटली. टक्केवारीत हे प्रमाण 16 वरून 9.6 वर आले असून, गेल्या दाेन दशकांतील ही सर्वांत माेठी घट आहे.
 
26 ट्न्नयांना सामाजिक सुरक्षा : जगभरातील केवळ 26.4 टक्के मुलांनाच सामाजिक सुरक्षेचा लाभ मिळत असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.बालमजुरीच्या जाळ्यात फसलेल्या मुलांना सामाजिक सुरक्षा अत्यल्प मिळत असल्यामुळे एकदा या मजुरीत अडकल्यावर फार कमी मुले त्यातून बाहेर पडू शकतात.
 
‘जीडीपी’च्या एक टक्केच खर्च : जागतिक पातळीचा विचार केला, तर मुलांसाठीच्या सामाजिक सुरक्षा याेजनांवर सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या (जीडीपी) केवळ एक टक्का खर्च केला जाताे. आफ्रिकन देशांत तर हे प्रमाण ‘जीडीपी’च्या 0.4 टक्के एवढीच रक्कम खर्च केली जाते.
 
90 लाख मुलांना धाेका : काेराेना महामारीमुळे निर्माण झालेल्या जागतिक आर्थिक संकटामुळे लाखाे मुलांना बालमजुरी करावी लागण्याचा इशारा ‘युनिसेफ’च्या अहवालात देण्यात आला आहे. या वर्षाच्या (2022) अखेरपर्यंत सुमारे 90 लाख मुले या जाळ्यात अडकण्याची भीती संघटनेने व्यक्त केली आहे.
 
युद्धांमुळे संकट वाढले : अफगाणिस्तानात आलेली तालिबानी राजवट आणि रशिया-युक्रेन युद्धामुळे बालमजुरीचे संकट अधिक तीव्र झाले आहे. यादवी युद्धात हाेरपळत असलेल्या अफगाणिस्तानात कुटुंबांचे आर्थिक उत्पन्न कमी झाल्यामुळे तेथे गेल्या काही महिन्यांत दहा लाख मुले बालमजूर झाली आहेत.