चांगली व्य्नती ही आपली ओळख असावी

23 Jun 2022 14:49:46
 
 

good 
 
असे म्हणतात की, शरीर म्हणून आपला रंग किंवा इतरही रचनांवर उगाचच फुशारकी मारू नये. हेच वेगळ्या शब्दांत आपल्या संत-महात्म्यांनीही अनेकदा सांगितलेले आहेच.का रे भुललासी वरलिया रंगा? हा प्रश्न त्याच आशयाचा आहे. एकंदरच आपलीआयुष्याकडे पाहण्याची दृष्टी ही शरीराकडे नसून, मनाकडे असायला हवी, असेच सांगितले जाते.याचे एक कारण असेही असते की, शरीर नाशवंत आहे.
 
ते कधी ना कधीतरी संपूनच जाणार आहे. आपला चेहरा आत्ता कितीही सुंदर असला तरीही म्हातारपण आल्यावर चेहऱ्यावर सुरकुत्या पडणारच आहेत किंवा अंगी कितीही श्नती असली तरीही काळाच्या ओघात ती श्नती संपत जाणार, याचाही स्वीकार केलाच पाहिजे.हे जसे आपल्या शरीराबद्दल आहे तसेच आपल्याकडे आत्ता असलेल्या जबाबदारीबाबत किंवा मिळालेल्या पदाबाबतही आहे. कारण काम संपले की त्या पदावरून आपण दूर व्हायचे असते किंवा आपल्याला दूर केले जातच असते. त्यामुळे तेच आयुष्याचे अंतिम सत्य मानून काम करू नये. त्याऐवजी आपला स्वभाव चांगला ठेवावा.
Powered By Sangraha 9.0