आंतरराष्ट्रीय याेग दिनानिमित्त लष्कराच्या मिल्खासिंग क्रीडासंकुलात आयाेजिण्यात आलेल्या याेगासन कार्यक्रमात लष्कराच्या दक्षिण मुख्यालयातील (सदर्न कमांड) सर्व अधिकारी, कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय माेठ्या संख्येने व उत्साहात सहभागी झाले हाेते.
याेग ही देशाची प्राचीन देणगी आहे आणि तिचे महत्त्व लष्कर जाणते. मानसिक ताण कमी करणे आणि निरामय आयुष्यासाठी याेग हा फार महत्त्वाचा घटक आहे. कार्यक्षमता वाढवण्याबराेबरच सकारात्मक दृष्टिकाेन वृद्धिंगत करण्यासाठी सर्व जवान, अधिकारी व त्यांच्या कुटुंबीयांनी याेग हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनवावा. लष्कराच्या सर्व क्रीडासंस्थांत याेग हा अभ्यासक्रमाचाच भाग बनवण्यात आला आहे, असे यावेळी सांगण्यात आले.