याेग म्हणजे परिपूर्ण जीवन पद्धती : राज्यपाल

    23-Jun-2022
Total Views |
 
 

Yog 
 
याेग म्हणजे केवळ शारीरिक आसने नाहीत, तर याेग म्हणजे शारीरिक, मानसिक व भावनिक स्वास्थ्य देणारी परिपूर्ण जीवन पद्धती असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह काेश्यारी यांनी येथे केले.परराष्ट्र मंत्रालयाच्या विभागीय कार्यालयातर्फे राजभवनात आंतरराष्ट्रीय याेग दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी राज्यपाल बाेलत हाेते. राजभवनाच्या दरबार हाॅलमध्ये आयाेजित याेग दिन कार्यक्रमाला 30 देशांचे राजनैतिक व व्यापार प्रतिनिधी, तसेच भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या शिष्यवृत्तीवर भारतात शिक्षण घेत असलेले विविध देशांचे विद्यार्थी उपस्थित हाेते.
 
राज्यपालांनी विविध देशांच्या वाणिज्यदूतांशी संवाद साधला, तसेच उपस्थित मार्गदर्शकांचा सत्कार केला. यावेळी फिटनेस गुरू मिकी मेहता यांच्या मार्गदर्शनाखाली याेगासने करण्यात आली. विभागीय पारपत्र अधिकारी राजेश गवांडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.यावेळी वास्तूरचनाकार अनुजा सावंत यांचे ‘वास्तू शास्त्र’ या विषयावर, डाॅ.श्वेता भाटिया यांचे ‘आहारातील मेद’ या विषयावर, तसेच त्वचा विशेषज्ज्ञ डाॅ.श्रुती बर्डे यांचे ‘नैसर्गिक त्वचेसाठी गुंतवणूक’ या विषयावर भाषण झाले.संगीत जुगलबंदीने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाला आयसीसीआरच्या विभागीय संचालिका रेणू प्रिथियानी उपस्थित हाेत्या. यावेळी ‘द याेग इन्स्टिट्यूट’च्या प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली राजभवनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही याेगासने केली.