काेणत्याही आघातातून सावरता येते

    23-Jun-2022
Total Views |
 
 
आघात केवळ शारीरिक नसताे, मानसिक, भावनिकसुद्धा असताे, हे लक्षात ठेवा
 
 
Sad
संध्यानंद.काॅम
‘आघात’ ही व्यक्तिसापेक्ष संकल्पना असल्यामुळे एखाद्यासाठी ताे आघात असला, तरी दुसऱ्यासाठी ताे असेलच असे नाही. लैंगिक आघाताचे मानसिक परिणाम जास्त तीव्र असल्याचे दिसले आहे. एखाद्या अपघातामुळे अथवा दुर्घटनेमुळे, तणावामुळे आघात हाेणे साहजिक असते.त्यात लैंगिक अत्याचार आणि महामारीसारख्या घटनांचाही समावेश हाेताे. पूर अथवा भूकंपासारख्या नैसर्गिक संकटांचा परिणाम सगळ्यांवरच हाेत असताे.या काळात भीती, चिंता, संभ्रम, हताश हाेणे अशा भावना तीव्र हाेतात. या तणावाला ‘ट्राॅमेटिक स्ट्रेस’ म्हणतात आणि त्यामुळे हताश झाल्याची भावना येते. अनेकदा शारीरिक आणि मानसिक ऊर्जाही संपल्यासारखे वाटते. पण, आघाताच्या काळाला हा आपण देत असलेला प्रतिसाद असताे. यातून बाहेर येण्यासाठी तज्ज्ञांनी काही उपाय सांगितले आहेत.
 
आघाताला सामाेरे जाताना ध्न्नयाची तीव्रता किती आहे यावर काेण किती काळात आघात विसरेल हे ठरते. आघात तीव्र असले, तर ताे झालेली व्यक्ती त्याच जागी वारंवार जात असेल, तर सावरण्यास वेळ लागताे.माेकळेपणाने बाेला बसलेला धक्का किंवा झालेला आघात मूकपणाने सहन करणे किंवा ताे दडविण्यातून काही साध्य हाेत नाही. यातून बाहेर येण्यासाठी तज्ज्ञांची मदत घेतली पाहिजे. पण तुम्हाला ते नकाे असेल, तर तुमच्या विश्वासातील एखाद्या व्यक्तीबराेबर माेकळापणाने बाेला. बाेलण्यातून तणाव कमी हाेऊन आघाताची तीव्रताही घटते.वर्तनाची काळजी आघाताच्या काळात लाेकांचे वर्तन वेगळे हाेऊ शकते. पण, संबंधितांनी त्याची काळजी घेतली पाहिजे.भावनांकडे दुर्लक्ष करू नका तुम्ही लक्ष दिलेत आणि नाही दिलेत, तरी भावना येत राहतात.पण, त्यांच्याकडे दुर्लक्ष मात्र करू नका. तुम्हाला आतून काय वाटते आहे याकडे लक्ष ठेवा.
 
विचार करणे बंद करा आपल्याबाबत घडलेल्या आघाताचा वारंवार विचार करत राहण्याने त्रास वाढताे.त्याचा परिणाम मज्जासंस्थेवर हाेऊन आराेग्याचे प्रश्न निर्माण हाेतात. स्वत:ला गुंतवून ठेवलेत, तर आघाताचा विसर पडण्यास मदत हाेते.दैनंदिन जीवन सुरू करा आघात वाईटच असला, तरी त्याचा विचार करण्याने काही हाेत नसल्यामुळे आपले दैनंदिन जीवन पूर्ववत सुरू करण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे मनातील भीती आणि चिंता दूर हाेतील. तुमचे जेवण, झाेपेच्या वेळा सांभाळा आणि मित्र, तसेच कुटुंबीयांबराेबर वेळ घालवा.
 
साेशल मीडियापासून लांब तुम्हाला सहन कराव्या लागलेल्या आघाताच्या प्रसंगातून बाहेर येण्यासाठी साेशल मीडियापासून लांब राहा किंवा त्याचा वापर अगदी कमी करा. तुम्हाला आलेल्या कटू अनुभवाची दृश्ये पाहत राहिलात तर त्रास वाढेल.समाजाभिमुख व्हा एकटे राहण्याने चिंता वाढत असल्यामुळे समाजाभिमुख व्हा. मित्रांचे वर्तुळ वाढवा. सपाेट ग्रुपच्या मेळाव्यांना गेलात, तर तुम्ही आघातातून लवकर बाहेर येता.रिलॅ्नसेशनचे तंत्र ध्यान, याेगासने किंवा खाेल श्वासाेच्छ्वास या तंत्रांतून आघाताच्या तीव्रतेपासून दूर हाेता येते.त्यामुळे तुम्हाला झेपणारे यातील काही उपाय तज्ज्ञांच्या सल्ल्याने अमलात आणा.