पाळीव कुत्रीही लठ्ठपणाची शिकार हाेऊ शकतात

    23-Jun-2022
Total Views |
 
 

Obesity 
 
 
माणसांप्रमाणे डाॅगीही लठ्ठपणाची शिकार हाेऊ शकतात. शारीरिक व्यायामाचा अभाव आणि जास्त खाण्यामुळे त्यांचेही वजन वाढते व ते लठ्ठपणाची शिकार हाेतात.काही लाेक आपल्या पाळीव डाॅगीला सतत काही ना काही खायला देत राहतात.हेही एक कारण आहे जेव्हा डाॅगीच्या शरीरात अवाजवी प्रमाणात व्हाइट एडिपाेज टिश्यू साचू लागतात तेव्हा या स्थितीला केनाइन ओबेसिटी वा कुत्र्यांमधील स्थूलता म्हणतात. स्थूलता डाॅगीचे आयुष्य सुमारे दाेन वर्षे कमी करते. लठ्ठपणामुळे त्याला हृदयराेग, मधुमेह, उच्च रक्तदाब, हाडांना दुखापत, ऑस्टियाेऑर्थरायटिस यांसारखे आजार हाेऊ शकतात.
 
लक्षणे ओळखा : जर कंबरेच्या चारी बाजूंना जादा चरबी वाढली असेल, डाॅगीला स्पर्श केल्यानंतर बरगड्या जाणवत नसतील, त्याला श्वास घेण्यास त्रास हाेत असेल, ताे धावू शकत नसेल, सुस्त राहात असेल तर आपला डाॅगी लठ्ठपणाची शिकार असेल.या कारणांमुळे वाढते वजन डाॅगी खाण्यातून जेवढी कॅलरी घेत असेल त्याचे शरीर तेवढा वापर करू शकत नसेल. ही कॅलरी त्याच्या शरीरात चरबीच्या रुपात साचू लागते.शारीरिक क्रिया न झाल्यामुळेही शरीरात चरबी वाढते.माणसांप्रमाणे डाॅगींमध्येही वय वाढण्यासाेबत मेटाबाॅलिज मंदावते व पचनक्रियाही मंद हाेते. ज्यामुळे लठ्ठपणाचा धाेका वाढू लागताे.लॅब्राडाेरमध्ये लठ्ठपणाचा धाेका जास्त असताे.
 
याशिवाय टेरियर, स्पॅनियल, डॅशहाऊंड ने बीगल या इतर जातीतही आनुवांशिक रुपान लठ्ठपणाचा धाेका जास्त असताे.न्यूटेरिंग एक वैद्यकीय प्रक्रिया आहे ज्यात डाॅगीला नपुंसक बनवले जाते.या प्रक्रियेमुळे हार्माेन प्रभावित हाेतात आणि मेटाबाॅलिज्मही प्रभाविते हाेते.ज्यामुळे डाॅगीचे वजन वाढते.कित्येकदा काही औषधांमुळेही लठ्ठपणा वाढताे.डाॅगींमध्येही हायपाेथायरायडिज्ममुळे लठ्ठपणा वाढू शकताे.कुशिंग राेगात अत्यधिक काॅर्टिसाेल बनू लागतात. ज्यामुळे पाॅलिफेजियाची (अत्यधिक भूक लागणे)समस्या हाेते व ही लठ्ठपणाचे कारण बनते.
 
पाळीव प्राण्यांकडे लक्ष द्या संतुलित आहार, व्यायाम आणि आहार देण्याच्या पद्धतीवर लक्ष द्या.पाळीव प्राण्याला प्राेटीनने भरपूर आणि कमी चरबीचा आहार द्या.यामुळे पाळीवाचे पाेट भरलेले वाटेल.वारंवार भूक जाणवणार नाही.डाॅगीला माणसाप्रमाणे जेवणदेऊ नये.कारण त्यांच्यात चरबीचे प्रमाण जास्त असते. बाजारात डाॅगींसाठी असलेले विशिष्ट प्रकारचेच खाणे द्या.डाॅगीला पळवा व त्याच्यासाेबत खेळा. जेणेकरून त्याची ऊर्जा टिकून राहील.