ब्रेकअप केल्याने मुलीला पाठवले सात लाखांचे बिल

    23-Jun-2022
Total Views |
 
 

Breakup 
एक विचित्र प्रकरण चीनमधून समाेर आले आहे. ज्यामध्ये ब्रेकअप केल्यामुळे भलीमाेठी शिक्षा मुलीला मिळाली आहे. साेशल मीडियावर मिळालेल्या माहितीनुसार एका तरुणाच्या प्रेयसीने त्याच्याशी ब्रेकअप केलं. ज्यामुळे त्याने आपल्या गर्लफ्रेंडला ब्रेकअप बिल पाठवलं, जे पाहून गर्लफ्रेंडला धक्काच बसला. कदाचित हे बिल पाहून तिला ब्रेकअप केल्याचा पश्चात्ताप हाेत असावा.हे प्रकरण ऐकायला खूप मजेदार वाटत असले, तरी त्या व्यक्तीने हे खराेखर केलं आहे. या तरुणाने आपल्या गर्लफ्रेंडवर केलेला खर्च एकत्र लिहून ठेवला आणि या खर्चाची भलीमाेठी यादी तिला पाठवली आणि हे पैसे तिला परत करण्यासाठी सांगितले.खर्चाचा ब्रेकअप लाॅग सध्या चीनच्या साेशल मीडियावर प्रचंड लाेकप्रिय हाेत आहे. पाण्याच्या बाटलीपासून ते चिप्स आणि इतर स्नॅक्सपर्यंतचा हिशेबही या लाॅग लिस्टमध्ये लिहिला गेला आहे.
 
परिस्थिती काहीही असाे, पण मुलाची स्मरणशक्ती आणि सर्जनशीलतेचे लाेक काैतुक करत आहेत, तर अनेकांना त्याचं हे वागणं पटलेलं नाही.व्यक्तीने तयार केलेल्या यादीत किरकाेळ खर्चही लिहिला आहे. यामध्ये 2 पाण्याच्या बाटल्या आणि स्नॅक्सचा खर्चही समाविष्ट आहे. मुलीने एकटीने खाल्लेला नाश्ताही लिहिला आहे आणि जाेडप्याचा खर्चही लिहिला आहे.रात्रीचे जेवण आणि जेवणाचा खर्च त्याने दाेघांमध्ये अर्ध-अर्धा केला आहे.मुलीची आई आजारी पडली हाेती, तेव्हा रुग्णालयात दाखल करण्याचा खर्च आणि तिच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारासाठी देण्यात येणारा खर्च देखील या यादीत नमूद केला आहे. ही संपूर्ण रक्कम 6 काेटी 1 लाख 47 हजार 025 युआन म्हणजे भारतीय चलनात सुमारे 7 लाख रुपये आहे. मुलीने त्याला हे पैसे दिले की नाही हे माहीत नाही, परंतु हे जाेडपं या प्रकरणानंतर भलतंच चर्चेत आलं आहे.