भारतात गरजेपेक्षा रक्तची उपलब्धता अजूनही कमीच

    23-Jun-2022
Total Views |
 
 
वर्षाला 1.35 काेटी युनिटची आवश्यकता; मिळते 1.10 काेटी युनिट; विकसित देशांचीरक्त दानात आघाडी
 

Blood 
 
संध्यानंद.काॅम रक्ताला पर्याय नाही. त्याचे वेगवेगळे गट असतात आणि रुग्णाच्या गरजेनुसार वैद्यकीयतज्ज्ञ ते देतात.अपघात, युद्ध, नैसर्गिक आपत्तींसारख्या काळात रक्ताची मागणी वाढते. रक्त माणसेच देऊ शकत असल्यामुळे रक्तदात्यांकडेविचारणा केली जाते.रक्तदानाबाबत जागरूकता वाढत असली, तरी रक्ताचा तुटवडा कायम असल्याचे दिसते.रक्तदान करण्यापूर्वी...रक्तदात्याचे वजन 45 किलाेग्रॅमपेक्षा कमी असू नये.टॅटू काढल्यानंतर 12 महिन्यांनी रक्तदान करता येते. एक युनिट रक्तदानासाठी 10 ते 15 मिनिटे लागतात.प्रसूत झालेल्या महिलेला 1 वर्षानंतर रक्तदानाची परवानगी.
 
हिमाेग्लाेबिनचे प्रमाण 12.5 ट्न्नयांपेक्षा कमी असता कामा नये.वय वर्षे 18 ते 45 वयाेगटांतील निराेगी व्यक्ती रक्तदानासाठी याेग्य असतात. (स्राेत : राष्ट्रीय रक्त परिषद.) दरराेज 12 हजार मृत्यू : रक्तदान माेहिमेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या ‘सिंपली ब्लड’ या संस्थेच्या दाव्यानुसार, रक्ताअभावी देशात राेज 12 हजार मृत्यू हाेतात. देशात राेज 1.5 काेटी युनिट रक्ताची गरज असल्याचे या संस्थेचे म्हणणे आहे.श्रीमंत देश आघाडीवर : जागतिक आराेग्य संघटनेच्या माहितीनुसार, जगभरात दरवर्षी 11,850 काेटी युनिट रक्तदान हाेते आणि त्यातील 40 टक्के वाटा श्रीमंत आणि विकसित देशांचा आहे. या 40 टक्के देशांमध्ये जगातील साेळा टक्के लाेकसंख्या राहते.