पुणे येथील विश्वकर्मा विद्यालयाच्या 1997 ते 2022 या कालावधीतील माजी विद्यार्थी व शिक्षकांचा स्नेहमेळावा रविवार 19 जूनला आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी शाळा संचालक आर. सी. बेटावदकर, मुख्याध्यापक जाधव, शिक्षिका सरडे तसेच विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी, शिक्षकवृंद, माजी विद्यार्थी या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित होते.