रागावर नियंत्रणासाठी वापरा ही पंचसूत्री

    22-Jun-2022
Total Views |

Relax
रिलॅ्नसेशनचे तंत्र शिका, क्षमा करा आणि थाेडा ब्रेकसुद्धा घ्यावयास हवा
राग ही नैसर्गिक भावना असल्यामुळे प्रत्येकाला ताे केव्हा ना केव्हा येताेच. मतभेद हे त्याचे मूळ कारण असते. दाेन व्यक्ती आपली मते ठामपणाने मांडत असताना आवाज वाढणे साहजिक. पण रागाचा परिणाम नकारात्मक हाेत असल्यामुळे कामाची लय बिघडते. त्यामुळे राग टाळणे जमायला हवे. लाइफ काेच आणि उद्याेजक हर्षित मलिक यांनी त्यासाठी पाच उपाय सांगितले आहेत. ते अमलात आणले, तर रागावर नियंत्रण ठेवता येईल.
 
1) रिलॅ्नसेशनचे तंत्र शिका : राग नियंत्रणात ठेवण्यासाठी या तंत्राचा वापर करता येताे. खाेल श्वासाेच्छ्वास केल्यामुळे शरीरात ऊर्जेचा संचय हाेताे. त्यामुळे राग जाताे आणि आपण समजूतदारपणाने वागताे.हा प्रसंग सावकाशपणाने हाताळायला हवा याची जाणीव हाेते. काम सुरू करण्यापूर्वी आवडते संगीत ऐका किंवा काही याेगासने करा. त्याचा उपयाेग हाेताे.
 
2) शारीरिक प्रतिसादावर नियंत्रण : रागाच्या भरात शारीरिक हालचाली वाढतात.पण त्या टाळा आणि शांत राहण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी या हालचालींवर नियंत्रण ठेवयला शिकले पाहिजे. समाेरच्या स्थितीचा विचार करून निर्णय करा आणि रागातून काय साध्य हाेणार, असा प्रश्न स्वत:ला करा.
 
3) तुमचे विचार लिहून ठेवा : रागावर काबू मिळविण्यासाठी लेखन हा पर्यायही उपयुक्त ठरताे. आपल्याला राग का येताे आणि तेव्हा आपण कसे वागताे, याची नाेंद करून ठेवा. तुम्हाला एखाद्याच्या वर्तनाचा राग येत असेल, तर त्याची कारणे शाेधा. लेखनामुळे राग खूप शांत हाेताे आणि लेखनाच्या सवयीमुळे तुमची शब्दसंपत्तीसुद्धा वाढते.
 
4) ब्रेक घ्या : परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊन राग येण्याची चिन्हे दिसल्यावर स्वत:साठी थाेडा वेळ काढणे, म्हणजे ब्रेक घेणे चांगले. काम बाजूला ठेवा आणि जेवण करा किंवा एखादा कप चहा-काॅफी घ्या. साेबत तुमचा जिवलग मित्र असेल तर चांगलेच. ते श्नय नसेल, तर बाहेर जाऊन थाेडे फिरून या. चालण्यामुळे राग जाताे.
 
5) क्षमा करायला हवी : एखाद्याचा राग आला तरी ताे विसरून त्याला क्षमा करायला शिकलात, तर तुम्हाला राग येणे कमी हाेऊ लागते. त्यामुळे तुम्ही कामावर अधिक एकाग्रतेने लक्ष केंद्रित करू शकता.हे पाच उपाय अमलात आणलेत, तर तुम्हाला रागावर नियंत्रण मिळविता येऊन जीवन समाधानी हाेते, असा हर्षित मलिक यांचा सल्ला आहे.