घाेडा आणि माणसाची रेस झाल्याचे कधी ऐकले आहे का? पण एक ब्रिटिश धावपटू रिकी लाईट फूटने गेल्या शनिवारी लेन व्हर्टिड वेल्समध्ये आयाेजित करण्यात आलेल्या घाेड्यांची रेस जिंकली.या रेसमध्ये माणसे व 60 घाेडे मिळून 1200 स्पर्धक हाेते. उत्तर पश्चिम इंग्लंडमधील कुप्रियाना डर्हाम या गावाचा रहिवासी रिकी लाइटफूट फायर ब्रिगेडचा कर्मचारी आहे. त्याने 35 किलाेमीटर अंतराची ही घाेडा आणि माणूस रेस 22 मिनिटे 23 सेकंदात जिंकली. यापूर्वी 2007 मध्ये फ्लाेरिन हाॅटलिंगर याने ही रेस जिंकली हाेती. हाॅर्स अॅन्ड मॅन ही रेस 1980 पासून आयाेजित करण्यात येते. तिला चांगला प्रतिसाद मिळताे.