दगडूशेठ ट्रस्टच्या कार्यकर्त्यांतर्फे माऊलींच्या मानाच्या अश्वांचे पूजन
  
‘माऊली... माऊली’ आणि ‘गणपती बाप्पा माेरया’च्या जयघाेषात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी साेहळ्यातील मानाच्या अश्वराजांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला अनाेखी मानवंदना दिली. प्रत्यक्ष मंदिराच्या सभामंडपात अश्वांनी प्रवेश करुन गणरायाला वंदन केले.या वेळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे विश्वस्त व सुवर्णयुग तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अश्वांचे पूजन करत आराेग्यसंपन्न भारताकरिता श्री गणेश आणि माऊली चरणी प्रार्थना केली. अश्वांचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात भाविकांनी माेठी गर्दी केली हाेती.
 
 
बेळगाव जिल्ह्यातील अंकलीतून शिताेळे सरकार यांच्या मालकीच्या या दाेन अश्वांचे पुण्यात आगमन झाले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात या अश्वांचे पूजन करण्यात आले. या वेळी ट्रस्टचे सुनील रासने, महेश सूर्यवंशी, माणिक चव्हाण, अक्षय गाेडसे यांच्यासह उर्जीतसिंह शिताेळे (सरकार), महादजी राजे शिताेळे (सरकार), पंढरपूर देवस्थानचे गहिनीनाथ महाराज औसेकर, राजाभाऊ थाेरात, मारुती महाराज काेकाटे, बाळासाहेब वांजळे, याेगेश गाेंधळे यांच्यासह वारकरी माेठ्या संख्येने उपस्थित हाेत