शिवमच्या हंगर लंगरमध्ये गरिबांना मिळते 10 रुपयांत जेवण

    21-Jun-2022
Total Views |
 
 
 
 
Shivam
रेस्टाॅरंट आणि टिफिन सर्व्हिसचे काम करणाऱ्या 20 वर्षांच्या शिवमने मित्राकडून 20 हजार रुपये उसने घेऊन ‘स्ट्रिट- 16’ नावाचे रेस्टाॅरंट सुरू केले. पण या रेस्टाॅरंटद्वारे चांगला नफा हाेत असतानाच त्याला साेरायसीस झाला. त्यामुळे त्याच्या रेस्टाॅरंटमध्ये ग्राहक येईनासे झाले. त्यामुळे शिवमला रेस्टाॅरंट बंद करावे लागले.त्यानंतर त्याला वाईट दिवस आले.त्याला भीक म्हणून दिलेले अन्न खाऊन आणि दवाखान्यातील बेंचवर झाेपून दिवस काढावे लागले. या वाईट दिवसांनी त्याला गरिबी किती वाईट असते याची जाणीव झाली. शिवमने कष्ट करून 25 हजार रु.कमविले व इंदूरमध्ये गरिबांसाठी ‘हंगर लंगर’ सुरू केले आहे. 10 रुपयांत पाैष्टिक जेवण ताे देत आहे. इतर मध्यमवर्गीय ग्राहकांसाठी हंगर लंगर थाळी 30 रुपयांत मिळते. दर रविवारी या हंगर लंगरमध्ये गरिबांना माेफत जेवण देण्यात येते.
 
वडिलांचे निधन झाल्यावर शहरात जाऊन काहीतरी कामधंदा करावा या हेतूने 500 रु. खिशात घेऊन शिवम इंदूरला आला; पण राेज दिवसभर शहरात हिंडूनही त्याला काम मिळाले नाही. कधी गुरुद्वारामध्ये जेवायचे, तर कधी दानशूर लाेक भिकाऱ्यांना फूड पॅकेट वाटत असतील, तर ते फूड पॅकेट खाऊन रेल्वे स्टेशन, बसस्टँड किंवा दवाखान्यातील बेंचवर शिवम झाेपायचा.अशा स्थितीत शिवमने दिवस काढले व त्याला भूक, गरिबी काय असते याची जाणीव झाली. आत्महत्या करावी असा विचारसुद्धात्याच्या मनात आला. पण गुरुद्वारामधील निरपेक्ष लंगर सेवा पाहून त्याच्यात जगण्याची जिद्द निर्माण झाली व त्याने मजुरी करून 25000 रु. जमा केले व ‘हंगर लंगर’ सुरू केले.मंदिरात भाेजन प्रसादाला भंडारा म्हणतात व गुरुद्वारामध्ये मिळणाऱ्या भाेजन प्रसादाला ‘लंगर’ म्हणतात.यापासून बाेध घेऊन शिवमने इंदूरमध्ये माता गुजरी काॅलेजजवळ हंगर लंगर रेस्टाॅरंट सुरू केले.