वाचनामुळे व्य्नितमत्त्व घडते...

    21-Jun-2022
Total Views |
 

Reading 
विचारश्नतीला चालना मिळते व उत्कट, उदात्त व व्यावहारिक विचार करणारे मन तयार हाेऊन उपयाेगी व उपकारक असे काहीतरी घडू शकते.आपली प्रत्येक कृती निर्दाेष हाेण्यासाठी आपल्यातील कला, कसब वाढवण्यासाठी व आपली इच्छाश्नती प्रखर हाेण्यासाठी वाचन जरूर आहे.मेंदू जितका कार्य करत राहील तितकी त्याची कार्यक्षमता वाढते, असे सांगितले जाते. वाचन म्हणजे मेंदूसाठीची कसरत किंवा व्यायाम आहे. वाचनाने मेंदू सतत कार्यरत राहताे आणि अधिक कार्यक्षम हाेताे. म्हणून लहान मुलांमध्ये वाचनाची सवय लागली, तर पुढे माेठे हाेऊन ही मुलं हुशार बनतात.
 
ताणापासून सुटका : व्यस्त आणि धावपळीच्या जीवनात वाचन हे असे औषध आहे जे तुमचा कंटाळा, ताण झटक्यात दूर करतं. पुस्तक वाचताना तुम्ही तुमचं आयुष्य विसरून एका वेगळ्या जगात असता. हे जग तुम्हाला ताण विसरायला भाग पाडते.शब्दसंपत्ती : माणसाची श्रीमंती त्याच्या शब्दसंपत्तीवर पहिली जाते. फक्त याचसाठी नाही, तर तुमच्या आयुष्यात तुम्ही आपले म्हणणे किती याेग्य शब्दात मांडू शकता, यावर तुमचे यश अवलंबून आहे.वाचनामुळे तुम्ही उत्तम संवाद साधू शकता, तसेच तुमच्या लेखन काैशल्यात भर पडते.त्यामुळे जितका जास्त शब्दसंग्रह, तितके यश तुम्हाला मिळत जाते.