देशाचे आधारस्तंभ उपकेंद्राद्वारे घडतील : मुख्यमंत्री

    21-Jun-2022
Total Views |
 

Pune 
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या दिंडाेरी तालुक्यातील उपकेंद्राचे शिवनाईत भूमिपूजन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्रातून विविध प्रकारचे शिक्षण मिळणार आहे, या उपकेंद्राच्या माध्यमातून देशाचे आधारस्तंभ घडवण्याचे काम हाेणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.दिंडाेरी तालुक्यातील शिवनाईत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्राच्या नियाेजित इमारतीच्या भूमिपूजन साेहळ्यात मुख्यमंत्री दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधत हाेते. कार्यक्रमास केंद्रीय आराेग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री डाॅ. भारती पवार, पालकमंत्री छगन भुजबळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. कारभारी काळे, उपकुलगुरू डाॅ. संजीव साेनवणे, कुलसचिव डाॅ.प्रफुल्ल पवार, दिंडाेरीचे प्रांताधिकारी संदीप आहेर, शिवनाईच्या सरपंच सुनंदा निंबाळकर यांच्यासह शिवनाईचे ग्रामस्थ, महाविद्यालयाचे प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित हाेते.
 
शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्रात काैशल्य विकासांतर्गत वाइनरी, पैठणी बनवणे अशा स्थानिक पातळीवर असणाऱ्या उद्याेगांच्या प्रशिक्षणाची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे, असे डाॅ.पवार यांनी सांगितले. या उपकेंद्राच्या सक्षमीकरणासाठी पाच काेटींचा निधी जिल्हा नियाेजन समितीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही भुजबळ यांनी दिली. सामंत यांनीही मनाेगत व्य्नत केले.भजबळ व सामंत यांच्या हस्ते उपकेंद्राच्या नियाेजित इमारतीचे भूमिपूजन करून काेनशिलेचे अनावरण करण्यात आले. विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. कारभारी काळे यांनी प्रास्ताविकात नाशिक उपकेंद्राची व त्या अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती दिली.